Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेवगाव – बोधेगाव येथील मारहाणीत झालेल्या मृत्यू प्रकरणी आरोपीस अटक

शेवगाव – बोधेगाव येथील मारहाणीत झालेल्या मृत्यू प्रकरणी आरोपीस अटक

बोधेगाव – शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे महिलेच्या झालेल्या छेडछाड प्रकरणातुन झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवराज बाबासाहेब गरड याचा उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग याला रात्री बीड जिल्हा हद्दीत सापळा रचून अटक केली आहे.

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील महिलेची झालेल्या छेडछाड बाबत आरोपीस विचारना केली, त्यावेळी रागाने लक्ष्मण तुकाराम अभंग यांनी व त्यांच्या साथीदार यांनी तलवार, गजाने, लोखंडी फायटर, लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अमोल दिगंबर भराट (वय २० वर्ष, रा हातगाव ता शेवगाव) यांनी दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच युवराज बाबासाहेब गरड यांना डोक्यास व हातास मांडीवर जबर मारहाण केली होती. जखमींवर उपचार सुरू होते. अमोल दिगंबर भराट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग, संदीप तुकाराम अभंग, अनिल सुनिल मातंग उर्फ काळ्या, प्रकाश सुसे उर्फ भाऊ सुसे, भाउसाहेब देशमुख रिक्षावाला, योगेश जाधव सर्व राहणार हातगाव ता. शेवगाव यांच्यावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जबर जखमी झालेले फिर्यादी अमोल दिगंबर भराट, युवराज बाबासाहेब गरड, अंकुश रामेश्वर ज-हाड सर्व रा हातगाव
यांच्यावर अहमदनगर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. युवराज बाबासाहेब गरड यास औरंगाबादला हलविण्यात आल. मात्र उपचार सुरू असताना युवराज गरड याचा मृत्यू झाल्याने शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. हातगाव येथे जखमी मयत झाल्याने तणावग्रस्त वातावरण होऊन आरोपीस अटक केल्या शिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय गरड कुटुंब व नातेवाईकानी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. आरोपी सापडने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

- Advertisement -

उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, शेवंगाव पोलीस ठाण्याचे पो.नि.रामराव ढिकले यांनी पथक तयार केले. मुख्य आरोपी लक्ष्मण तुकाराम अभंग यास मोठ्या शिताफीने बीड जिल्ह्यातील येलंब येथे हेड कॉन्स्टेबल आण्णा पवार , राजू ढाकणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक विश्वास पावरा हे करीत असून या घटनेमुळे हातगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या