Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : अरणगाव रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू

Share
jalgaon

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-दौंड रस्त्यावर पेगो आणि कारचा सोमवारी (दि. 13) साडेचार वाजता अपघात झाला. त्यात पेगोमधील एकाचा मृत्यू झाला. बबन रज्जाक शेख (रा. लातूर, हल्ली रा. खंडाळा, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. पेगोमधील दोन-तीन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नगर-दौंड रोडवरील अरणगाव शिवारात (ता. नगर) कारला पेगो रिक्षाची मागून धडक बसली. या अपघातात पेगोमधील बबन रज्जाक शेख यांचा मृत्यू झाला. मृताच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!