Thursday, May 2, 2024
Homeनगरसंगमनेर : 8 जणांना करोना; 5 महिला व तीन पुरुषांचा समावेश

संगमनेर : 8 जणांना करोना; 5 महिला व तीन पुरुषांचा समावेश

निगेटिव्ह अहवाल आलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यात आज 8 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुक्याची संख्या 81 वर पोहचली आहे तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 30 आहेत. तर करोना बाधित कुटुंबातील एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर बाळाचा करोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात शहरातील नवघर गल्ली येथील एक व्यक्ती करोना बाधित आढळून आली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेला त्याचा भाऊ देखील करोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने सदर व्यक्तीचे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुलांची देखील तपासणी केली. या सर्वांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यातील एका चार महिन्याच्या मुलीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली.

गुरुवारी रात्री सदर बाळाला उलट्या, जुलाब होऊ लागल्याने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारमी संगमनेरात 7 करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये लखमीपुरा येथील 32 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील 48 वर्षीय महिला, डाके मळा येथील 38 वर्षीय महिला, तर निमोण येथील एकाच कुटुंबातील 36 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगी यांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. त्यानंतर रात्री संगमनेर येथील 73 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. ही व्यक्ती नाशिकहून प्रवास करून आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या