Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

Video: महाराष्ट्रातील 6 लाख पर्यटकांची केरळला भेट; बोट लिग, जटायू शिल्पाचे आकर्षण

Share

नाशिक । प्रतिनिधी

ईश्वराची भूमी, बॅकवॉटरचा प्रदेश आणि आयुर्वेद वैद्यकीय पर्यटनात देशात क्रमांक एकचे राज्य असलेल्या केरळमध्ये चालू वर्षी महाराष्ट्रातील सुमारे 5 लाख पर्यटकांनी भेट दिली असून दिवाळी सुट्टीनंतर पर्यटनात वाढ होणार आहे. वर्षभरात सुमारे 6 लाख महाराष्ट्रीय पर्यटकांनी केरळ पर्यटन केलेले असेल, अशी माहिती केरळ पर्यटन मंत्रालयचे पर्यटक माहिती अधिकारी पी. के. सूरज यांनी पत्रपरिषदेस दिली.

ओनम हा केरळीन उत्सव नुकताच साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बॅक वॉटरमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स बोट लिगच्या(सीबीएल) पहिल्या मोसमाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलच्या धर्तीवर सीबीएल आयोजित करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या ऑॅगस्टमध्ये सूरू झालेली सीबीएल यावर्षी नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे असे सांगून सूरज म्हणाले, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटक नंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक केरळमध्ये सहलीसाठी भेट देतात. चालू वर्षी 5 लाख यावर्षाअखेर महाराष्ट्रातील सुमारे 6 लाख पर्यटकांनी केरळला भेट दिलेली असेेल.

महाराष्ट्रात आणि विशेषत: नाशिकमध्ये केरळ पर्यटन विभागाच्या पार्टनरशिप परिषदेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सूरज म्हणाले, नाशिकमध्ये प्रभू रामचंद्राचे वास्तव होते. नुकताच रामायणा सर्किटमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. नाशिकमध्ये धार्मिक पर्यटन पूर्वीपासूनच विकसित आहे, केरळमध्येही रामायणातील जटायू हे जगातील सर्वात भव्य पक्षी शिल्प उभारले आहे.

त्या अनुषंगाने नाशिकसह महाराष्ट्रातील पर्यटक पर्यटनासाठी केरळा भेट देत आहेत. यासह देशातील पहिलं आणि एकमेव जैवविविधता संग्रहालय जे पूर्वी बोट हाऊस होते त्याचा कायापालट करुन राज्यातील पहलिे सायन्स ऑना स्फिअर सिस्टीम मध्ये त्याला रुपातरित करण्यात आले. यासह विविध आकर्षण महाराष्ट्रातील पर्यटकांना खुणावतील, असेही सूरज यांनी सांगितले.

केरळमधील आयुवेर्र्द वैद्यकीय पर्यटन, निसर्ग आणि मान्सूम पर्यटन, समृद्ध कला, मार्शल आर्ट-कल्लरीपयट्टू, तय्यमची समृद्ध परंपरा या अनुषंगाने पर्यटन विकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.  दरम्यान, केरळचे शास्त्रीय नृत्य मोहिनीअट्टम, कथकली, मयूरनृत्य, पारंपरिक वादन आणि कलरीपयट्टू या युद्धप्रसंगी केल्या जाणार्‍या मार्शल आर्टसह विविध पर्यटन माहितीपटांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

पर्यटन वृद्धीमध्ये केरळ अग्रणी
केरळ देशांर्गत पर्यटनामध्ये नेहमी अव्वल राहीले आहे. यंदाही विदेशी तसेच देशांर्गत पर्यटकांमध्ये पूरपरिस्थितीनंतरही वृद्धी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जागतिक मंंदिचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही जाणवला मात्र त्यातून बाहेर पडून पर्यटक केरळमध्ये येत असल्याचे सूरज यांनी सांगितले. चालू वर्षात देशातील 41 लाखा 90 हजार 468 पर्यटकांनी केरळला भेट दिली. ही संख्या 2018 मध्ये 38 लाख 77 हजार 712 इतकी होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!