Type to search

Breaking News Featured नाशिक

26 गावांसाठी 5 कोटी; आमदार कदमांच्या प्रयत्नांना यश

Share

निफाड । प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील 26 गावांसाठी शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे तुकाराम महाराज मंदिर सभामंडपासाठी 20 लाख रुपये, चापडगाव येथे मुख्य रस्त्यासाठी 20 लाख रुपये, तामसवाडी येथे सभामंडपासाठी 10 लाख रुपये, पिंपळगाव निपाणी ते बेरवाडी या रस्त्यासाठी 20 लाख रुपये, रसलपूर फाटा ते रसलपूर गाव या रस्त्यासाठी 20 लाख रुपये, रसलपूर येथे सभामंडपासाठी 20 लाख रुपये, रानवड येथे गावांतर्गत रस्त्यासाठी 10 लाख रुपये, जळगाव येथे गावांतर्गत रस्त्यासाठी 10 लाख रुपये.

रामपूर येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामासाठी 10 लाख रुपये, कसबे सुकेणे येथे सभामंडपासाठी 20 लाख रुपये, दिक्षी येथे आदिवासी वस्ती सभामंडपासाठी 5 लाख रुपये, मौजे सुकेणे ते ओणे रस्त्यासाठी 20 लाख रुपये, लोणवाडी ते शिरवाडे वणी रस्त्यासाठी 20 लाख रुपये, शिरवाडे वणी ते आहेरगाव रस्त्यासाठी 20 लाख रुपये, पालखेड ते आहेरगाव रस्त्यासाठी 20 लाख रुपये, पंचकेश्वरचे देवपूर गणपती मंदिर या रस्त्यासाठी 30 लाख रुपये, नांदुर्डी ते निफाड या महत्त्वाच्या रस्त्यासाठी 40 लाख रुपये निधी आमदार अनिल कदम यांनी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत मंजूर केला आहे.

त्याचप्रमाणे ओझर शहरातील मुस्लीम कब्रस्तान वॉलकंपाउंडसाठी 30 लाख रुपये, ओझर बाजारपेठ रस्त्यासाठी 20 लाख रुपये, ओझर शिवाजी चौक ते ग्रामपंचायत ओझर या रस्त्यासाठी 20 लाख रुपये, त्याचप्रमाणे ओझरच्या सोनेवाडी रस्त्यासाठी 20 लाख रुपये, निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीसाठी 20 लाख रुपये, खानगावथडी येथील सभामंडपासाठी 10 लाख रुपये, मुखेड येथील रस्त्यासाठी 30 लाख रुपये.

अंतरवेली येथील नदीलगत रस्त्यासाठी 15 लाख रुपये, दारणासांगवी येथे स्मशानभूमी रस्त्यासाठी 20 लाख रुपये आमदार कदम यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आले आहे. या सर्व कामांना प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर प्रारंभ होणार आहे. या गावांना निधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आमदार अनिल कदम यांचे अभिनंदन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!