Friday, April 26, 2024
Homeनगरआणखी 48 नमुने तपासणीला

आणखी 48 नमुने तपासणीला

शनिवारी 12 कोरोना अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी 12 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल शनिवारी निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, शनिवारी पुन्हा 48 स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात कोपरगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कातील आणि पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील संशयीत व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी बाधित आढळलेल्या कोपरगाव येथील महिलेला शनिवारी बूथ हॉस्पिटल मधून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच मुकुंदनगर येथील 76 वर्षीय बाधित व्यक्तीसही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आले. या व्यक्तींनी प्रकृती विषयी तक्रारी केल्याने त्यांना अधिक तपासणीसाठी शिफ्ट करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मुरंबीकर सांगितले. उर्वरित 21 रुग्णावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित तीन व्यक्तींना 14 दिवसानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोपरगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेची हिस्ट्री तपासली असता त्यातून अजून ठोस काही हाती आलेली नाही. बाधीत महिला आणि तिचा भाऊ असे दोघे एकत्र राहत होते. आम्ही कोठेही प्रवास केलेला नाही, असे वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या जवळच्या व्यक्ती आणि घराजवळ राहणार्‍यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या