Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

1354 नादुरूस्त मतदान यंत्रे परत पाठवणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागात सदोष आढळलेली 533 बॅलेट युनिट व 821 व्हीव्हीपॅट यंत्रे जिल्हा निवडणूक शाखेकडून बंगळुरू येथील भेल कंपनीकडे परत पाठवण्यात येणार आहेत. मतदानपूर्व सरमिसळ प्रक्रिया व प्रत्यक्ष मतदानावेळी यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. विभागातील मतदान यंत्रेदेखील संबंधित कंपनीकडे परत पाठवली जाणार आहेत.

राज्य निवडणूक शाखेच्या माध्यमातून नाशिकसह जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा मागवण्यात आली होती. पुणे आणि बंगळुरू येथील भेल कंपनीकडून मतदान यंत्रे प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी 8578 बॅलेट युनिट, 6176 कंट्रोल युनिट आणि 6533 व्हीव्हीपॅट यंत्रणा प्राप्त झाली होती.

इतर जिल्ह्यातील मतदारसंघनिहायदेखील संपूर्ण ईव्हीएम यंत्रणा त्या-त्या जिल्ह्यांना प्राप्त झाली होती. प्राप्त मतदानयंत्रांची निवडणुकीपूर्वी सरमिसळ चाचणी प्रक्रिया घेण्यात आली. त्यात काही यंत्रांमध्ये बिघाड जाणवला. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी करण्यात आलेली यंत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झालेला बिघाड अशी यंत्रे आता पुन्हा संबंधित कंपनीकडे परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!