Saturday, April 27, 2024
Homeनगरआजपासून दहावीची परीक्षा

आजपासून दहावीची परीक्षा

76 हजार परीक्षार्थी : 17 दिवस राहणार परीक्षेचा कालावधी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत आहे. 76 हजार 221 विद्यार्थ्यांची नोंद या परीक्षेसाठी असून 23 मार्चपर्यंत या परीक्षा सुरू राहतील. पहिला पेपर मराठीचा असून परीक्षेचा कालावधी एकूण 17 दिवसांचा राहणार आहे.

- Advertisement -

माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व तयारी केली असून जिल्ह्यातील 178 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यात सर्वाधिक 17 केंद्र प्रत्येकी नगर व संगमनेर येथे आहेत. तर सर्वात कमी 5 केंद्र जामखेडमध्ये आहेत. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्यानंतर आता दहावीची परीक्षेचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाजयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची नियुक्ती करण्यात आली असून समितीचे सभासद परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी किंवा पाहणीसाठी 7 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांवर अनावश्यक लोकांचा जमाव जमू नये, यासाठी 100 मीटर परीसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. गणित व इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी बैठे पथक प्रत्येक केंद्रावर असणार आहे.

नगर ग्रामीण 3182, अकोले 5244, जामखेड 2569, कर्जत 3612, कोपरगाव 5486, नेवासा 7111, पारनेर 4050, पाथर्डी 4697, राहुरी 4263, संगमनेर 8100, शेवगाव 4794, श्रीगोंदा 4629, श्रीरामपूर 5450, राहाता 5500, नगर शहर 7534 एकूण 76221 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या