Friday, April 26, 2024
Homeनगरदहावीच्या माका केंद्रावर डमी परीक्षार्थी पकडला

दहावीच्या माका केंद्रावर डमी परीक्षार्थी पकडला

हॉलतिकिटावर बनावट विद्यार्थ्याचा फोटो लावून झाला होता प्रविष्ठ

सोनई (वार्ताहर)– नेवासा तालुक्यातील माका येथील दहावी परीक्षा केंद्रात एका 34 वर्षे वयाच्या व्यक्तीने दहावी परीक्षेसाठी बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या संगनमताने हॉल तिकिटावर स्वतःचा फोटो लावून मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेऊन परीक्षेस बसल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून विद्यार्थ्यासह डमी बसलेल्या व्यक्तीवर सोनई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत माका येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संभाजी कारभारी आरगडे (वय 54) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश रामराव पालवे (वय 34) रा. पालवेवाडी, अकोले ता. पाथर्डी व आडगाव ता. पाथर्डी या शाळेचा विद्यार्थी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, माका येथील दहावी परीक्षा केंद्रात आडगाव ता. पाथर्डी येथील विद्यालयाचा विद्यार्थी (आरोपी क्र. 2) व आरोपी क्र. 1 यांनी संगनमताने माका येथील न्यू इंग्लिश स्कूल (केंद्र क्र. 2187) मधील हॉल नं. 1 चे ठिकाणी मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या मराठी भाषेच्या पेपरमध्ये बोर्ड परीक्षेचे हॉल तिकिट जे ऑनलाईन संबंधित शाळेमधून विद्यार्थ्यांना प्राप्त होते.

त्यावर बनावट विद्यार्थी आरोप क्र. 2 याचा फोटो लावून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन मराठी भाषेच्या पेपरसाठी बनावट विद्यार्थी म्हणून आरोपी क्र. 1 (गणेश रामराव पालवे) हा पेपर देण्यासाठी बसवून त्यासाठी मूळ हॉलितिकिटामध्ये बनावटीकरण करुन पुणे बोर्डाची फसवणूक केली.

या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 77/2020 भारतीय दंड विधान कलम 419, 420, 34 सह बोर्ड, विद्यापीठ व विनिर्दीष्ठीत परीक्षांमधील गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा 1982 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार ए. एम. दहिफळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या