इंग्रजी, गणिताच्या पेपरचे शुटिंग

18 पासून बारावी तर 3 मार्चपासून दहावीची परीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – दहावी, बारावी परिक्षेची तयारी पूर्ण झाली असून संवेदनशील केंद्रातील सगळ्याच परिक्षार्थीचे गणित व इंग्रजीच्या पेपरावेळी व्हिडीओ शुटिंग केले जाणार आहे. तसा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

18 फेबु्रवारीपासून बारावीची तर 3 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात 178 तर बारावीसाठी 99 केंद्र आहेत. बारावीची परीक्षा 23 तर दहावीची परिक्षा 17 दिवस सुरू असणार आहे.

परीक्षा केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर जमावबंदी आदेश लागू असणार आहे. याशिवाय कलेक्टर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक) उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी असे 7 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार आणि बीडीओ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर इंग्रजी आणि गणिताच्या पेपराचे व्हिडीओ शुटिंग केले जाणार आहे.

पेपर कधी…
दहावी – 9 मार्च : इंग्रजी, 12 मार्च : गणित
बारावी – 18 फेब्रुवारी : इंग्रजी, 28 फेबु्रवारी : गणित

परीक्षा केंद्र

दहावी- 178, बारावी- 99

विद्यार्थी

दहावी- 76221
बारावी- 66908