Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

रानू मंडल यांना पहिल्या गाण्यासाठी मिळाले एवढे मानधन

Share

मुंबई | वृत्तसंस्था

राणू मंडल यांचा गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस या व्हिडिओला व्ह्यूज वाढत चालले आहे. रातोरात स्टार होणाऱ्या लोकांन मध्ये रेल्वे स्टेशनवर राणू मंडल यांचा देखील समावेश झाला आहे.

या गाण्यासाठी राणू मंडल यांना हिमेश रेशमियाने दिलेल्या मानधनाचा खुलासा झाला आहे. हिमेश रेशमियांचा आगामी ‘हॅप्पी हार्डी अँँन्ड हीर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. रानू मंडल यांनी या चित्रपटासाठी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. दरम्यान, मंडल यांच्या गाण्याचा व्हिडिओला 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे.

एका वृत्तानुसार रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रानू यांनी गायलेल्या पहिल्या गाण्यासाठी त्यांना हिमेशने जवळपास सात लाख रुपये मानधन दिले आहे. परंतु हिमेशने देऊ केलेले मानधन रानू स्वीकार करत नव्हत्या.

पण त्यांना हिमेशने अगदी आग्रहाने हे पैसे दिले आहेत. त्याचबरोबर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असेही सांगितले. बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नसल्याचे म्हणत हिमेशने त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!