Type to search

Breaking News Featured सार्वमत

रस्ता ओलांडताना एसटी बसने महिलेला चिरडले

Share
ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने विद्यार्थ्यास चिरडले, Latest News Kukana Duble Trolly Tractor Accident Student Death

अहमदनगर | प्रतिनिधी

रस्ता ओलांडत असताना पादचारी महिलेला एसटी बसने चिरडले. ही घटना स्टेट बँक चौकात दुपारी दोन वाजता घडली. अंजना धीवर (वय- 60 रा. कापुरवाडी ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजना धीवर या स्टेट बँक चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एसटी बसची अंजना धीवर यांना जोराची धडक बसली. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला.

जखमी अंजना धीवर यांना बाजूला घेत नागरिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु रुग्णवाहिका वेळवर आली नाही. अपघामुळे चौकात गर्दी होवू लागली होती. स्थानिक पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. अंजना या जखमी अवस्थेत तशाच पडून होत्या.

त्याच दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या गाडीतून जखमी अंजना यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अंजना या गंभीर जखमी होत्या. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भिंगार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!