केवळ ८९९९ मध्ये मिळतोय २० एमपी सेल्फी कॅमेऱ्यावाला हा स्मार्टफोन

0

हा स्मार्टफोन केवळ ८९९९ रुपयांत मिळतोय. त्याला आहे २० मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, ३ जीबी रॅम आहे. यात ४जीबी रॅमचाही फोन उपलब्ध आहे.

इन्फिनिक्स मोबाईल ते त्यांचा Infinix Hot S3 हे मॉडेल आजच भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. तो नवीनच आलेल्या अँड्रॉईडच्या ओरिओ ८.० या प्रणालीवर आधारित असेल.

यातील ३ जीबी/३२ जीबी मॉडेल केवळ ८९९९ रुपयांत, तर ४ जीबी/६४ जीबी १० हजार ९९९ रुपयांत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

हा मोबाईल केवळ फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावरच येत्या १२ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध  होणार आहे.

५.६५ इंचाचा मोठा एचडी स्क्रीन, १.४ गिगा हर्टझ ऑक्टा कोअर प्रोसेसर, सेल्फी कॅमेरा २० मेगा पिक्सेल्स आणि मुख्य कॅमेरा १३ मेगा पिक्सेल्स, बॅटरी ४ हजार एमएएच, वायफाय, ओटीजी कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ ४.२ अशी सुविधा यात आहे.

LEAVE A REPLY

*