बिग बींची तब्येत आता ठिक; डॉक्टरांनी केली तपासणी

0

मुंबई, ता. १३ : ठग्ज ऑफ हिंदोस्तांच्या सेटवर जोधपूर येथे रात्रभर शुटींग केल्यानंतर पहाटे तब्येत बिघडल्याची आणि मुंबईच्या डॉक्टरांना बोलावल्याची माहिती ब्लॉगद्वारे अमिताभ बच्चन यांनी दिली होती.

त्यानुसार आज दुपारी डॉक्टरांचे एक विशेष पथक जोधपूरला दाखल झाले. या पथकाने तपासणी केल्यानंतर बिग बींची तब्येत ठिक असल्याचे सांगितले जात आहे.

आज पहाटे अमिताभ बच्चन यांनी लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्री. बच्चन यांनी ठग्ज ऑफ हिंदोस्तां या चित्रपटाच्या सेटवर पहाटेपर्यंत शुटिंग केले. त्यानंतर त्यांची तब्येत खराब झाली. सध्या ते हॉटेलमधील आपल्या खोलीत आराम करत आहेत.

अभिनेता आमिर खान त्यांच्यासोबत आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीसाठी विशेष विमानाने मुंबईहून जोधपूरला रवाना झाले.

त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सकाळी लिहिले होते की त्यांना बरे वाटत नाहीये आणि डॉक्टरांकडून उपचार घेऊन पुन्हा तयार होईन. तोपर्यंत मी आराम करणार असून तुमच्या संपर्कात राहिल.

LEAVE A REPLY

*