लासलगावच्या आंब्याची अमेरिकेला भुरळ

0
लासलगाव : अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडल्याने भारताबाहेर आंब्याच्या मागणीत प्रचंड वाढ होतांना दिसत आहे.
दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक आता आंब्याचे निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे.

नाशिकमधून मागील वर्षी सुमारे 570 मेट्रिक टन आंबा पाठविण्यात आला होता आणि यावर्षी 1000 मेट्रिक टन निर्यातीची अपेक्षा आहे.

कोकण आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही शेतकरी आपले उत्पादन नाशिकला पाठवतात आणि निर्यात करण्यापूर्वी त्यावर लासलगाव येथील विकिरण केंद्रात आंब्यावर प्रक्रिया करुन ते निर्यातीसाठी पाठवले जाते.

आतापर्यंत लासलगाव विकिरण केंद्रात 400 मॅट्रिक टन आंब्यावर प्रक्रिया करुन निर्यातीसाठी रवाना करण्यात आलेले आहे. निर्यातीसाठी पाठविल्या जाणार्‍या आंब्यावर नाशिकमधील ओझर येथे गरम पाण्याची प्रक्रिया ही हॅलॉनमध्ये पॅक हाऊसमध्ये केली जाते.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. आणि कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (कॉनकोर) यांच्यातील संयुक्त उपक्रममध्ये ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लासलगाव येथे भाभा परमाणू संशोधन केंद्रातील विकिरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई विमानतळाकडे निर्यात केली जाते.

युरोपियन देशांकडे निर्यातीसाठी आंब्यांवर गरम पाण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर ओझर येथे अंतर्देशीय कंटेनर डेपो (आयसीडी) आणि हवाई मालवाहतूक कॉम्प्लेक्स येथे स्थित हलकॉनच्या पॅक हाऊसमध्ये हे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाय अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना निर्यात करण्यासाठी आंब्यावरील विकिरण प्रक्रिया अनिवार्य आहे. हे जिल्ह्यातील लासलगाव विकिरण केंद्रामध्ये केले जाते. यूएसए आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना निर्यात करण्यापूर्वी आंब्याची विकिरण करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे भाभा रिसर्च सेंटर (बीआरसी) च्या लासलगाव अभिकरण केंद्रावर विकिरण प्रकल्पाचे आयोजन केले जाते. मागील वर्षी येथे सुमारे 570 मेट्रिक टन आंब्याची निर्यात युरोपीय आणि नॉन-युरोपियन देशांद्वारे केली होती. यावर्षी 1000 मेट्रिक टन आंबे निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेलकोनने ओझर विमानतळाजवळ अंतर्देशीय कंटेनर डेपो (आयसीडी) आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्सची स्थापना केली होती ज्याचे उद्घाटन 15 मार्च 2008 रोजी तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी केले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कंपनीने जवळपास 70 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

LEAVE A REPLY

*