Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

व्हाटस्अपच्या माध्यमातून बारा तासात मुलाची आई-वडिलांशी भेट

Share

लासलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून आई-वडिलांपासून दुरावलेल्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील एका मुलाला अवघ्या बारा तासात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

अधिक माहिती अशी कि (दि. २९) सप्टेंबर रोजी सनी पाठक यांना सायंकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे सात ते आठ वर्षाचा मुलगा फिरतांना आढळून आला. दरम्यान शनिपेठक यांनी समयसूचकता दाखवत तात्काळ त्या मुलास लासलगाव पोलीस स्टेशन येथे आणले.

यावेळी पोलिसांनी या मुलाकडे विचारपूस केल्यानंतर लक्षात आले कि त्याचे नाव पवन रमेश पावरा असून तो रा. खिरोदा, जिल्हा जळगाव अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी आपली चक्रे फिरवून याकामी सोशल मीडियाचा आधार घेतला. पोलीस स्टेशन हद्दीतील व्हाट्सअप ग्रुप व तसेच नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील व्हाट्सअप ग्रुपवरती फोटो व त्याची प्राथमिक माहिती प्रसारित करण्यात आली. सदर मुलाच्या आई-वडिलांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या १२ तासात शोध घेण्यात आला. पवनला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलाला पाहताच आई-वडिलांच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!