लासलगावला कांदा दरात घसरण

0
लासलगाव | दि. ६ वार्ताहर – लासलगाव बाजार समितीत आज लाल कांद्याला सकाळच्या सत्रात सरासरी ३५५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुपारच्या सत्रात आवक वाढताच सरासरी भावात ७०० रुपयांनी घसरण होऊन २८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मंगळवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली.

ढगाळ वातावरण त्यातच दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी ५०० वाहने असल्याने कांद्याच्या भावत वाढ झाली होती. दुपारनंतर वाहनांच्या संख्येत वाढ होताच घसरण झाली. सध्या लाल कांदा काढणीचे काम वेगाने सुरू असताना बेमोसमी पावसाचे शेतात पाणी साचल्याने काढणीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

लासलगाव बाजार आवारावर लाल कांदा आवक १७,८३८ क्विंटल होऊन सकाळचे सत्रात बाजारभाव किमान २००० कमाल-४०१२ – सरासरी २८७१ रूपये प्रती क्विंटल होते आज ११८५ वाहनां मधील कांद्याचे लिलाव झाले ६०० वाहने शिल्लक राहिले दुपरच्या सत्रात आवक वाढताच भावात ७०० रुपयांनी भावात घसरन झाली बदलते हवामान,परदेशातून आयात करण्यात आलेला कांदा या मुळे भाव उतरतील या भीतीने शेतकर्‍यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस आणण्याची घाई करीत आहे.

LEAVE A REPLY

*