Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव : कोटमगाव येथील विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू

Share

लासलगाव : लासलगाव जवळील कोटमगाव येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी पहाटे साडे बाराच्या दरम्यान असून चैताली अशोक सुपेकर असे मुलीचे नाव आहे.

कोटमगाव येथील सुपेकर कुटुंब नेहमीप्रमाणे घरामध्ये झोपलेले असताना शनिवारी पहाटे साडे बाराच्या वाजेच्या दरम्यान नागाने चैतालीच्या उजव्या कानाला चावा घेतला. कानाजवळ तीव्र वेदना होत असल्याने तीने घडलेला प्रकार हा आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी तात्काळ लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले.

येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांनी पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. नाशिक येथे पोहचण्याच्या अगोदर शालेय विद्यार्थिनी चैतालीचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!