कमी बोली लावल्याने कांदा लिलाव बंद

0

लासलगाव । दि. 3 वार्ताहर
परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने दोन दिवसातच कांद्याच्या दरात सुमारे 1100 रुपयांची प्रतिक्विंटल वाढ झाली होती. मात्र, दर तेजीत असताना लासलगाव बाजार समितीत व्यापार्‍यांनी कांद्याला दुपारच्या सत्रात लिलावात कमी भाव पुकारल्याने संतप्त शेतकर्यनी कांदा लिलाव बंद पाडला.

दरम्यान पोलिस आणि बाजार समितीच्या मदस्थीने शेतकर्‍यांची समजूत काढून कांदा लिलावाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

आज लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्या कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल सरासरी2300 रुपये क्विंटल तर रजास्तीत जास्त 2631 रुपये क्विंटल भाव होता.

मात्र दूपारच्या सत्रात कांद्याची आवकही वाढल्याने व्यापान्यांनी लिलावात कांद्याला थेट एक हजार रुपये कमी दराने बोली लावण्यास सुरुवात केली होती. त्यामूळे संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव बंद केले होते.

आज बाजार लासलगाव बाजार समितीत सुमारे 29 हजार 45 क्विंटल कांदा आवक झाली होती. समितीत कांद्याचे भाव वाढत असल्यान बाजार आवारात समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कांदा भरून आणलेले वाहने उभी होती.

लिलाव बंद पडून संतप्त शेतकरी समितीच्या बाहेर आले. त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी शेतकरी वर्गाची समजुत काढत त्यांना पुन्हा बाजार आवारात आणले.

बाजार समिति सभापती जयदत्त होळकर यांनी बाजार आवारात जावून दोन्ही घटकांशी चर्चा करुन लिलाव सुरु केले.अर्ध्या तासाच्या गोंधळ नंतर लीलाव पूर्वरत सुरु झाले.

अतिवृष्टीने दरवाढ
कांदा दरात वाढ होण्याचे प्रमुख काण म्हणजे मध्यप्रदेश, राजस्थान,कर्नाटक,बिहार या ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि त्यामूळे तेथील कांदा पीकाचे झालेले नुकसान होय.

परराज्यातील कांदा पावसाने खराब झाल्याने नाशिकच्या कांद्याला अचानक वाढली आहे. त्यामूळे गत दोन दिवसात कांद्याचे दर गगणाला भिडत असल्याचे चित्र नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये आहे.

पंधरा दिवसांपुर्वी कांद्याचे दर 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल दरावर होते. त्यात आता पाचपट वाढ झाल्याचे चित्र कांदा बाजारपेठेत आहे.

LEAVE A REPLY

*