Type to search

Featured

लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव बंद

Share

लासलगाव (वार्ताहर)  : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा फटका लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या लिलावास बसला आहे. कामगार वर्ग कामावर न आल्याने घेतलेल्या कांद्याचा निकास कसा करावा या विवंचनेने कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली. काही काळ लिलाव बंद होते, मात्र सभापती पोलिसांच्या सूचनेनंतर लिलाव पूर्ववत झाले.

आज लासलगाव बाजार समितीत 1257 वाहनातून लाल आणि उन्हाळ कांद्याची 20 हजार 612 क्विंटल कांद्याची आवक झाली होती लाल कांद्याला जास्तीतजास्त 1327 रुपये , सरासरी 1100 रुपये तर कमीतकमी 650 रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त 1461 रुपये , सरासरी 1200 रुपये तर कमीतकमी 900 रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाले.

लासलगाव येथील कांद्याच्या बाजारपेठेत जमावबंदी आदेश आणि कोरोना विषाणूच्या भीतीमुळे आज लासलगाव परिसरातील कामगार वर्ग व्यापाऱ्यांच्या गोडाऊन वर कांदा निवडण्यापासून ते गाडीमध्ये कांदा भरण्या पर्यंतच्या कामासाठी न आल्यामुळे कांद्याच्या लिलावानंतर घेतलेल्या कांद्याचा निकास कसा करावा या प्रश्नांमुळे कांदा व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याने व्यापाऱ्यांनी थेट कांदा लिलावासाठी न जाण्याची भूमिका घेतल्यामुळे कांद्याचे सुरू झालेले लिलाव बंद पडले होते.

आलेल्या कांद्याचे लिलाव सुरू करण्यासाठी व्यापारी व बाजार समितीच्या बैठकी चर्चेनंतर लिलाव सुरू करण्यात आले मात्र मंगळवार आणि बुधवारी सुट्टी असल्याने गुरुवारपासून कांद्याचा लिलावात सहभागी होणार नसल्याचा थेट इशारा कांदा व्यापारी दिल्याने भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निफाड उपविभागीय अधिकारी यांच्या आणि व्यापार्यांमध्ये बैठकीचे आयोजन करत कांद्याचे लिलाव कसे सुरळीत राहतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप सांगितले

शासन एकीकडे कांदा हा जीवनावश्यक वस्तूच्या यादीत सामावेश केला मात्र कामगारच असल्याने व्यापारी कांदा घ्यायला तयार नाही हा कांदा नाशवंत माला असल्याने कांद्याचे लिलाव बंद पडू नये यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असून कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहतील यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!