सप्तशृंगी गडावर दरड कोसळली; जाळीमुळे मोठी हानी टळली

0
सप्तशृंगी गड  | सप्तशृंगी गडावर चार वाजेच्या सुमारास मोठा दगड मंदिराच्या बाजूस कोसळला. यामुळे मंदिरातून परत जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

मंदिराच्या वरती लावलेल्या जाळीत हा दगड अडकला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आपत्ती विभागाचे अधिकारी आणि जाळी लावण्यात आली आहे त्या कंपनीचे अभियंते उद्या सकाळी याठिकाणी भेट देणार असून दगड आहे त्याच जागेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे फोडला जाणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

जाळी नसती तर हा अवाढव्य दगड गावावर कोसळला असता. जर या दगडावर जास्त भार आला तर मोठी हानी होऊ शकते त्यामुळे हा दगड काढण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घटनेची माहिती तहसीलदार यांना मिळताच त्यांनी घटनेची पाहणी करून ताबडतोब परत जाण्याचा धोक्याचा मार्ग बंद करण्याचे निर्देश देऊन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. परंतु एका मार्गाने दर्शन सुरु असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*