Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात दरड कोसळली; पोलीस अधीक्षकांची धाव

Share

इगतपुरी | वार्ताहर

गेल्या चोवीस तासापासुन पडत असलेल्या जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली आहे. गेल्या चोवीस तासात १७२ मि. मीटर पावसाची नोंद झाली असुन आजपर्यंत एकुण १३२३ मि. मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुख्य दरवाजात दरड कोसळली असुन मोठ्या प्रमाणावर डोंगरावरील पाण्याचा प्रवाह आतमध्ये घुसला. या घटनेत प्रकल्पात उभी असलेली काही वाहने वाहून गेल्याचे समजते. तर काही वाहने ढीगाऱ्याखाली चेंबली असल्याचेही कळते.

प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या असुन पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची हत्यारेही वाहून गेल्याचे वृत्त आहे. येथील पोलीस आणि सुरक्षारक्षकांसह अन्य व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन पोलिसांच्या रायफली पाण्यात वाहून गेल्या आहेत तर चार दुचाक्याही वाहून गेल्या आहेत.

कामगारांना सेवा देणारे मोठे वाहन मध्ये अडकले असुन वीजनिर्मिती केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने रस्ता बंद झाला आहे. विजनिर्मितीचे काम ताबडतोब थांबवण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे आदी अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

घोटीपासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. येथे धरणाच्या पाण्याच्या वापरातून वीज निर्मिती येथे करण्यात येते. हा जलविद्युत प्रकल्प डोंगराच्या कडेला आहे.

बुधवारी रात्री पासून या परिसरात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे डोंगरावरील मोठ्या प्रमाणावरील एक दरडीचा भाग थेट जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळला. अचानक झालेली घटना घडताच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढल्याने सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!