Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भूमी अभिलेख कार्यालयातील डामरे यास लाच स्वीकारल्याप्रकरणी चार वर्षे कैद व दंड

Share
राहुरी खुर्द येथील महावितरण कार्यालयासमोर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना तीन लाखांची खंडणी मागणार्‍या एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अकोले (प्रतिनिधी)- शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक दौलत नामदेव डामरे यांनी सहा हजार रुपये नाचती मागणी करून ती स्वीकारल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक कलम सात प्रमाणे तीन वर्ष साधी कैद व बारा हजार रुपये दंड, तर कलम 19 (2) प्रमाणे चार वर्षे शिक्षा व बारा हजार रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावल्या आहेत. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत. या निकालामुळे भ्रष्ट कर्मचार्‍यांना दहशत निर्माण होण्यास मदत होणार आहे.

संतोष हिरामण अस्वले (वय 27 धंदा- नोकरी, राहणार मुळशी तालुका अकोले) यांची कोतूळ येथे सर्वे नंबर 482 व 486 मध्ये सहा एकर 14 गुंठे जमीन बाळासाहेब देशमुख राहणार यांच्याकडून खरेदी केली. विकत घेतलेल्या जमिनीत सुधारणा करण्याकरिता प्रयत्न केले असता शेजारील शेतकरी यांनी प्रतिबंध केला. सदरचा हिस्सा आमचा असल्याचे सांगितल्यामुळे, जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भूमिअभिलेख कार्यालयाकडे जमिनीच्या मोजणीचा अर्ज दाखल केला. त्यावेळी कार्यालयातील श्री. पगारे यांनी हद्द कायम मोजणीसाठी साडेसात हजार रुपये भरावे लागतील.

त्यानंतर एक महिन्याने काम करून मिळेल असे सांगितले. त्याला एक हजार रुपयांची मागणी केली. पगारे यांना एक हजार रुपये देण्यात आले. अस्वले यांच्या आईने त्यानंतर साडेसात हजार रुपये मोजणीसाठी भरण्याऐवजी पाच हजार रुपयांत तुमची मोजणी करून देतो असे सांगितले. पगारे यांना दिलेल्या एकूण पैशांपैकी केवळ 1000 पावती देण्यात आली. त्यानंतर 22 जुलै 2009 रोजी मोजणीची नोटीस काढण्यात आली. मोजणी केल्यानंतर जानेवारी 2010 मध्ये आमचे शेतावर येऊन रोकडे यांनी मोजणी करून दिली. आईकडून एक हजार रुपये घेतले. मात्र पावती दिली नाही.आम्हाला हिस्स्याची मोजणी नको. हद्द कायम मोजणी करायची होती म्हणून कार्यालयात गेलो असता पगारे रजेवर असल्याने डांबरे हे काम पाहत होते.

त्यावेळी पगारे यांनी मोजणी करून देण्यासाठी सहा हजार रुपयाची मागणी केली. आठवड्यामध्ये सर्व कागदपत्रे तुमच्या ताब्यात देतो असे सांगितले. आईने 1000 त्यांना दिले व रुपये 5000 देखील त्यांना देण्यात आले. आईने मला त्यांचा मोबाईल नंबर दिल्यानंतर मी संपर्क साधला असता सहा हजार रुपये द्या व कागदपत्रे तयार असल्याचे सांगितले. सदरचे सहा हजार रुपये हे आमचे साहेब व लिखाण करणारा यांना द्यावे लागतात असे सांगितले. त्या वेळी झालेले संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही कागदपत्रे मिळत नसल्याने नाइलाज म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. 28 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांना फोन लावला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैसे देण्यासाठी मी अकोला येथे येण्यासाठी निघालो आहे. डामरे यांनी मला ठीक आहे, दहा वाजेपर्यंत अकोले येथे या. तुमचे काम होऊन जाईल असा संदेश त्यांनी दिला. सदरचा संदेश रेकॉर्ड करण्यात आला आहे.

त्यानंतर लाचलुचपत विभागाच्यावतीने संबंधितांना तक्रार प्राप्तीनंतर 29 ऑक्टोबर 2010 रोजी लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर 30 तारखेला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने जामीन मंजूर करून मुक्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयाकडे सादर केला. या प्रकरणाचा तपास विजय धोपावकर पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केला आहे. या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केल्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित आरोपीला आज शिक्षा सुनावली आहे.

सरकारी पक्षाच्यावतीने वकील भानुदास कोल्हे यांनी काम पाहिले. त्यांना शकील इनामदार यांनी मदत केली. तक्रारदार हे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. अकोले तालुक्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षा होण्याचा हा पहिलाच खटला असावा असे बोलले जात आहेत. या निकालामुळे भ्रष्टाचार करू पाहणार्‍या अनेक जनसेवकांना धक्का बसणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!