कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

0
शेतकरी कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – एमआयडीसीमधील संघटीत व असंघटीत कामगार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. एमआयडीसीच्या कामगारांच्या प्रश्‍नांवर क्रांतिसिंह कामगार संघटनेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
मात्र, काही जिल्हा बाहेरील कामगार हे दादागिरी व गुंडगिरी करत कामगार आयुक्त कार्यालयाच्या आदेशाला जुमानत नाहीत. या विरोधात क्रांतिसिंह कामगार संघटना आक्रमक होत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दोन तास चाललेल्या या धरणे आंदोलनात कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कॉ. रामदास वाघसकर, महादेव पालवे, प्रा. स्मिता पानसरे, विकास गेरंगे, वैभव कदम, रमेश वाकळे, अमोल पळसकर, कार्तिक पासलकर, दत्ता शितोळे, अमोल चेमटे आदींसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी किमान कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, इंडोस्कल्प ऑटोकॉम्प कंपनीतील बेकायदा बदल्या रद्द कराव्यात, एव्हग्रीन या कपंनीतील 10 कामगारांना कंपनीत समावून घ्यावेत, कर्मचार्‍यांच्या पी.एफ. चोरांवर कडक कारवाई करावी, कारखान्यांत काम करतांना अपंगत्व आलेल्या कामगारांना भरपाई देण्यात यावी,
न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणार्‍यांवर कडक करवाई व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात योगेश महाजन, गणेश नरवडे, अशोक आरोळे, संतोष देवढे, अनुप राठोड, तारा तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*