कुणी मजूर देता का मजूर? मजुरांची कमरता, अव्वाच्या सव्वा रोजंदारी

0
मुखेड | शेतीच्या कामांसाठी कुनी मजुर देता का मजुर? अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे.  शेतमजुरांच्या  अटी शेतकऱ्यांना मंजुर आहेत मात्र मजुरांचा तुटवडा जाणवत असून यामुळे शेतीची कामे रखडली आहेत.

शेतीच्या लागवडीआधीच्या मशागतीसाठी मोठा खर्च शेतकऱ्यांना मोजावा लागतो. त्यानंतर लागवड करायची तर मजुर शोधुन सापडत नाहीत.

एका एकराला सात ते आठ हजार रुपयांपर्यंत मजुरीचा दर गेला आहे. मजुर दिवसभर भेटत नाहीत. मजुरांच्या दारोदार हिंडूनदेखील त्यांना कामासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत.

अनेक ठिकाणाहून दुसरीकडे कामे सुरु असल्याचे उत्तर मजुरांकडून देण्यात येते. रोप लावणीला आलेले असताना याठिकाणी मात्र मजुरांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकरी मोठ्या मजूर संकटात सापडलेला दिसून येत आहे.

उत्तर प्रदेश बिहारी मजुरी मोठ्या संख्येने शेतात कामासाठी आलेले आहेत. परंतु त्यांना कांदा लागव अजून जमत नसल्यामुळ कांदा लागवडीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवतो आहे.

कांदा रोप जास्त दिवसांचे झाले की पुढे पाण्याचा तुटवडा जाणवतो त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटते. समाधानकारक कांदा लागवड होईल अशा प्रकारचे यंत्रदेखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे मजुरांच्या शोधात सध्या बळीराजा सर्वदूर फिरतांना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*