Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

Breaking# कुरकुंभ एमआयडीसीत आगडोंब अख्ख गाव खाली, पळापळ

Share

दौंड- येथून जवळच असलेल्या कुरकुंभ येथील तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या अल्कली अमाईन्स केमिकल प्रायव्हेट लि. कंपनीत स्फोट होऊन आग लागली त्यानंतर त्या शेजारील कंपनी हार्मोनी कंपनीत ही आग पसरली, असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या कंपन्या पुणे-सोलापूर महामार्गालगत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे कळताच प्रशासनाकडून आसपासच्या तीन किलोमीटरवरील गावकर्‍यांना गाव खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे भीतीमुळे ग्रामस्थांमध्ये एकच पळापळ झाली. लोक जे वाहन मिळेल त्या वाहनाने जीव मुठीत घेऊन पळत होते. काहींनी शेजारील गावात, दौंडमध्ये आसरा घेतला. काहीजणांची रात्री उशीरापर्यंत बाहेर पडण्याची कडपड सुरू होती. इतर कारखान्यातील कामगारांनाही घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कंपनीत जिवीतहानी झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. दौंडचे आमदार कुल यांनी घटनास्थळी धाव घेतली असून ही आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!