कुमारस्वामी सरकारला हादरा; दोन आमदारांनी काढला पाठिंबा

0
बेंगळुरू: लोकसभा निवडणुकांना अवघे चार-पाच महिने उरले असताना कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील दोन अपक्ष आमदारांनी जेडीयू-काँग्रेस युतीच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एच. नागेश आणि आर. शंकर अशी या दोन अपक्ष आमदारांची नावे आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपालांकडे लिखीत स्वरुपात आपला राजीनामा सोपवला आहे. “कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या युती सरकारमधून आम्ही ताबडतोब बाहेर पडत आहोत. त्यामुळे आपण आमच्या राजीनाम्यावर तत्काळ कार्यवाही करावी, असे या दोन्ही आमदारांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.”

मे२०१८मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये २२५पैकी सर्वाधिक १०४ जागा भाजपला मिळाल्या. पण ८० जागा मिळवणाऱ्या काँग्रेसने ३७ जागा मिळवणाऱ्या जेडीयूला पाठिंबा जाहीर केला आणि सत्तास्थापन केली. जेडीयू-काँग्रेस युतीला राज्यातील दोन अपक्ष आमदारांनी आणि एका बसपच्या आमदारानेही बाहेरून पाठिंबा दिला होता.
दोन अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर या दोघांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. आमदार आर. शंकर यांनी म्हटले की, आज मकरसंक्रांती आहे. या दिनानिमित्त आम्हाला सरकार बदलायचे आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे त्यामुळे आज आम्ही कर्नाटक सरकारमधून पाठींबा काढत आहोत.

 

LEAVE A REPLY

*