कुकाणा : बेलापूर-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात नागरिकांचे उपोषण

नेवासा-शेवगाव तालुक्यासह परिसरातील अनेक संघटना व ग्रामपंचायतचा जाहिर पाठींबा 

0

कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी शुक्रवार 1 डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगनात अमरण उपोषणाचा एल्गार पुकारला असून या उपोषणास परिसरातील संघटना व पदाधिकार्यांनी तसेच नेवासा-शेवगाव तालुक्यातील संघटनेने सरकारचा जाहीर  निषेध करत आपला जाहीर पाठींबा नोंदवला असून दिवसभर या ठिकाणी नागरिकांची गर्दी होती.

रेल्वे क्रुती समितीची भेट घेऊन राज्य सरकारचे केंद्र सरकारला बेलपुर-परळी रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील असल्याचे मागणी पत्र देण्याचे आश्वासन आमदार बाळासाहेब मूरकुटें यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

*