कुकाणा : नागरिकांच्या उपोषणाला खा.सदाशिव लोखंडे यांची भेट

0

कुकाणा : बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी शुक्रवार 1 डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटगणात अमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कुकाना येथे येऊन उपोषण कर्त्यांची भेट घेऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगून उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची विनती केली मात्र उपोषण कर्ते रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड यांनी मुंबई रेल्वेचे जनरल मनेजर यांच्याशी उपोषण स्थळी चर्चा करण्यास ठाम असल्याचे सांगून उपोषण सोडण्यास नकार देत उपोषण चालूच राहणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*