Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कुबोटा ट्रँक्टर व फवारणीयंत्र निर्जनस्थळी सोडून चोरट्यांची धूम

Share

शिंदवड | प्रतिनिधी 

तालुक्यातील तिसगाव येथील मळ्यातुन शिवाजी पंडीत बस्ते यांचा कुबोटा ट्रँक्टर व फवारणीयंत्र 2 तारखेच्या रात्री पहाटेच्या सुमारास गेटची व पँकीग हाऊसचा कडी कोयंडा तोडून चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शिवारातील एका वीटभट्टीच्या नजीक कुबोटा ट्रँक्टर, फवारणीयंत्र आढळून आले. सोशल मीडियात पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन्हीही वस्तू बसते यांना परत मिळाल्याल.

अधिक माहिती अशी की, बस्ते हे आपल्या बागेत फेरफटका मारण्यासाठी आले असतांना त्यांना गेटचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. कुबोटा ट्रँक्टर, फवारणीयंत्राची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, त्यांनी तात्काळ वणी पोलिसांशी संपर्क करत फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर वणी पोलीस तपास करत होते. 5 तारखेला कोराटे परिसरातील वीट भट्टीजवळ स्थानिक नागरिकांना कुबोटा ट्रँक्टर, फवारणीयंत्र आढळून आले.

या परिसरातील नागरिकांनी ओळख पटण्यासाठी सोशल मिडीयाची मदत घेत ट्रँक्टर व फवारणी यंत्राचा फोटो अपडेट केला. त्यानंतर शिवाजी बस्ते यांच्याशी संपर्क झाला.

त्यानंतर पोलिस आणि बस्ते यांनी घटनास्थळी जात कुबोटा ट्रँक्टरची ओळख पटवून घेतली. त्यानंतर  दुसऱ्या दिवशी फवारणी यंत्र आक्राळे (दिंडोरी) परिसरात एका शेडजवळ सापडले.

दोन्हीही वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहेत. चोरट्यांचा शोध गुन्हे शाखा आणि वणी पोलिसांकडून केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!