आजपासून ‘कृषीथॉन’ला प्रारंभ; 350 कंपन्यांचा सहभाग

शेतकरीच सरकारला ‘ऑफलाईन’ करतील - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाना

0
नाशिक |   ३५० कंपन्यांच्या सहभागात आणि शेतकऱ्यांच्या भरघोस प्रतिसादात आज मोठ्या उत्साहात कृषीथॉनला प्रारंभ झाला. यावेळी युवा शेतकऱ्यांनी शेतीत केलेल्या वेगवेगळ्या बदलांमुळे कमी खर्चात उत्पन्नवाढीत मोठी वाढ केली आहे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान कृषीथॉन प्रदर्शनाच्या प्रारंभीच्या दिवशीच करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,  खा. हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, ‘मविप’ सरचिटणीस निलिमा पवार, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे, ‘नाडा’ अध्यक्ष विजूनाना पाटील, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. यात ते म्हणाले की, सर्वांधिक परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. राज्यात नऊ हवामानाचे क्षेत्र आहे. त्यानुसार हवामान आधारीत कृषी धोरण राज्य सरकारने अंगीकारले पाहिजे. मात्र नवीन सरकार आल्यानंतरही तसे झाले नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी नाही तर ऐतिहासिक फसवणूक आहे. सरकार केवळ ऑनलाईन अर्ज, डिजीटलझेशनवर भर देत आहे.

सर्वच ऑनलाईन करणे सुरु आहे. सर्वच ऑनलाईन शेतकर्‍यांपर्यत पोहचत नाही. या ‘ऑनलाईन’सरकारला शेतकरीच ऑफलाईन करतील असे टिका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकार सध्या लाभार्थी शोधत आहे. मात्र खरे लाभार्थी त्यांच्या सरकारमधील मंत्री असे असे उपरोधिक भाष्य करुन पाटील यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर नेते राजकारण करत असून शेतीमाला हमी भाव मिळावा यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी आणि शेतकी आंदोलनाला पर्याय दिले जावे असे ते म्हणाले.

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्याची व्यवस्था कुचकमी आहे. ती शेतकरी आणि सामान्यांनासाठी कशी उपयुक्त होईल याचा विचार राज्य सरकारने करावा असा सल्लाही त्यांनी दिला. कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवणूक असून या योजनेचे तीनतेरा वाजले आहे.

कुणालाही उभे करुन खोटे प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि कर्जमाफिचा लाभ घेतला जात आहे. कृषी प्रदर्शनामुळे शेतकर्‍याना नवे तंत्रज्ञान अवगत होते असे सांगत येत्या काळात वातावरण बदलामुळे पिक पद्धतीत करावयाचे बदल आणि या समस्येवर तोडगा काढून शेतकरी कसा उभा राहिल याचे मार्गदर्शनही प्रदर्शनातून केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.

नाशिक जिल्ह्यातील शेतीप्रयोग पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येथे येतात असे सांगत माणिकराव ठाकरे यांनी या जिल्ह्याने नेहमीच राज्याला शेती मार्गदर्शनाची भूमिका निभावली आहे असे उद्गार काढले. यवतमाळ येथे किटकनाशकांमुळे 28 शेतकर्‍यांच्या मृत्यूचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, औषधी, शेती अवजारे विकणार्‍या दुकानांवर कारवाई करण्यापेक्षा अशी किटकनाशके तयार करणार्‍या कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

मात्र शासन या प्रकणावर चुकिचे निर्णय घेत आहे. कापूस आणि सोयाबिन पिकवणार्‍या भागात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगून अशा भागात कृषीप्रदर्शन भरवले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषी क्षेत्रात विकसित जिल्ह्यांनी अविकसित प्रदेशांना मदत आणि मार्गदशर्न करावे असे सांगत आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील पिक पद्धती बदलण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

खा. चव्हाण यांनी अशा प्रदर्शने शेतकर्‍यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढले. येथील शेतकरी प्रयोगशील असून इस्त्राईलचे शेतकरीही नाशिकच्या पीक पद्धतीचा उल्लेख काढतात असे सांगितले.

येत्या काही दिवसात कृषी विषयक ई-मासिक काढणार असल्याचे संजय न्याहरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी प्रगतीशील युवा शेतकरी, संशोधक, उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

*