कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवणार – सदाभाऊ खोत

0
नाशिक |  कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्राम सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त आहे. कृषी ग्राम सभा हा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

नाशिक उंटवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत श्री. खोत बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष जगदाळे यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, क्षेत्रीय कर्मचारी, आदि उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, सर्व कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच शेतकऱ्यांना त्यावर उपाययोजना सुचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचनाही श्री.खोत यांनी दिल्या आहेत.

कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांची यादीप्रमाणे विक्री होते असल्याबाबत कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी. तसेच या संदर्भात मार्गदर्शनासाठी मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी श्री. खोत यांनी दिले.

LEAVE A REPLY

*