Type to search

Featured सार्वमत

कोठीवर तडीपाराची गुंडागर्दी

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – तडीपारी झाली तरी गुंडागर्दीची सवय काही गेली नाही. दोन वाहनांतील अपघातानंतर आपसात सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी केल्याने तडीपार गुंडाने एकाला मारहाण केली. कोठी चौकात काल शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

बिरजू ऊर्फ विरजा राजू जाधव असे तडीपार केलेल्याचे नाव असून त्याने शाम मुरलीधर कांबळे यांना मारहाण केली. जाधव आणि त्याचा साथीदार सोन्या साळवे या दोघांविरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू जाधव याला जिल्हा प्रशासनाने दोन वर्षासाठी नगरातून तडीपार केले आहे
कोठी चौकात दोन वाहनांमध्ये अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांचे भांडण सुरू झाले. सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी शाम कांबळे हे पुढे सरसावले. ‘तू मध्ये का बोलतो, असे म्हणून जाधव व साळवे या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व विटाने मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!