Photogallery : श्रीक्षेत्र कोरठणला रंगला कुस्त्यांचा आखाडा

0
अहमदनगर :  दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता पारनेर येथे तिसऱ्या श्रावणी रविवार निमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांचा (हगामा) आखाडा या आखाड्यात उतरलेल्या लहानापासून तरूण पहिलवानांनी नेत्रदीपक कुस्त्या करून आखाडा गाजवला.
या कुस्त्यांना कुस्तीप्रेमी प्रेक्षक, भाविक यांनी भरभरून प्रतिसाद देत श्री खंडोबाचे देवदर्शनाबरोबर कुस्त्यांचा आनंद घेतला.
परंपरेप्रमाणे कोरठण देवस्थानजवळ देवस्थान ट्रस्ट कडून कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. दुपारी दोन वाजता आखाडा सुरू झाला यावेळी देवस्धानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड ,शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके , उपाध्यक्ष रामदास मुळे ,सचिव एस डी खोसे, खजिनदार बन्सी ढोमे ,जालिंदर खोसे, किसन मुंडे, सुरेश सुपेकर , महानगर बॅकेचे संचालक सुरेश ढोमे ,सरपंच अशोक घुले, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, उत्तम सुंबरे , राहुल पुंडे ,तानाजी मुळे, प्रदिप भाटे, भगवान भांबरे ,गोपीनाथ सुंबरे, साहेबराव पंडीत ,बी.आर.सुपेकर ,कैलास शिंदे   यांच्या सह ग्रामस्थ कुस्तीप्रेमी प्रेक्षक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आखाड्यात तीस वर्षाच्या आतील पहिलवानांच्याच कुस्त्या लावल्या जातील असे देवस्थान ट्रस्ट कडून स्पष्ट करण्यात आले होते जिल्ह्यातील तसेच परिसरातील अनेक तरूण कुस्त्या खेळण्यासाठी कोरठणला आले होते विजेत्या पहिलवानांना शेकडो रूपयांपासून हजारो रूपयांची बक्षिसे देण्यात आली वैयक्तिकरित्याही अनेक कुस्तीशौकीनांनी बक्षिसे दिली श्री खंडोबा भाविक पी.पी. मुळे विकास गाडगे यांच्याकडून उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

*