Friday, May 3, 2024
Homeनगरवीज बिल माफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा - कोते

वीज बिल माफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा – कोते

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील लॉकडाउन काळातील सर्वसामान्य जनतेचे वीज बिल माफ करावे यासाठी जिल्ह्यातील

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने उद्या गुरुवार दि. 26 रोजी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता कोते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली असून जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्ता कोते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला आलेले वीज बिल माफ करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर महावितरणच्या विरोधात गुरूवार दि. 26 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून त्या अनुषंगाने जिल्हा मनसेच्यावतीने सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल चितळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ता कोते, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेदहा वाजता नगर बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, पंचपीर चावडीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील सर्व मनसे अंगीकृत संघटना व जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या