Type to search

Featured नाशिक फोटोगॅलरी

Photo Gallery : ‘कोशिश करनो वालो की..’ स्नेहसंमेलनातून यशोगाथांचे दर्शन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

जीवनात वारंवार अपयश येऊनही खचून न जाता त्यावर जिद्द अाणि चिकाटीने मात करत यशाचे उंच शिखर गाठणाऱ्या असामान्य व्यक्तींचा जीवनप्रवास वार्षिक स्नेहसंमेनलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उलगडला. निमित्त होते, इस्पॅलियर स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे.

“कोशिश करनो वालो की..’ या संकल्पनेवर अाधारित या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी संगीत, नाटक, नृत्य या कलाविष्काराच्या माध्यमातून अब्राहम लिंकन, अाईनस्टाईन, थाॅमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञांपासून ते चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके, कवी कुसुमाग्रज, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर अशा विविध ५० व्यक्तींचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थित पालक व शिक्षकांकडून उत्स्फुर्त दाद मिळाली.

मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात इस्पॅलियर स्कूलतर्फे बुधवार (दि. ११) रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे अायोजन करण्यात अाले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. अजय निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे प्रमुख शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डाॅ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका अंकिता कुरिया यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

करिअरच्या टप्पा असो की, नोकरी व व्यवसायाच्या पहिल्या टप्प्यावर अनेकदा अपयश येत असते. अपयशामुळे अनेकांमध्ये नकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो. नैराश्य, ताणतणाव निर्माण होत असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीतही केवळ जिद्दीने अाणि कठोर परिश्रमाने अपयशावर मात करत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचे उंच शिखर गाठणाऱ्या असामान्य व्यक्तींचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असाच अाहे.

जगभरातील अशा ५० व्यक्तींची निवड करत त्यांचा हा प्रवास संगीत नृत्याविष्काराच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर करत विद्यार्थ्यांनी सकारात्मक जीवनाचा संदेश दिला. कोशिश करने वालो की..कभी हार नही होती…याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही नृत्य, नाटक व संगीताच्या माध्यमातून कलाविष्कारांचे अप्रतिम दर्शन घडविले.

स्टीव्ह जाॅब्स, नेल्सन मंडेला, बाबासाहेब अांबेडकर, बाळासाहेब ठाकरे, कल्पना चावला, मेरी कोम, डाॅ. अब्दुल कलाम, अजय अतुल यांच्यासह नाशिकचे गणिततज्ञ कापरेकर यांचा जीवनप्रवासही या स्नेहसंमेलनातून उलगडण्यात अाला. सुमारे तीन हजार पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या शेवटी साऊथ बॅण्डवर नृत्य सादर करत या स्नेहसंमेलनाचा ग्रॅण्डफिनाले साजरा केला.


सकारात्मक विचार देणारे गंभीर यांना यंदाचा बी द चेंज अवार्ड

मोटिव्हेशनल स्पीकरच्या माध्यमातून अातापर्यंत हजारो युवकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन रुजविणारे प्रवीण गंभीर यांना इस्पॅलियर स्कूलतर्फे यंदाचा बी द चेंज हा पुरस्कार या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात अाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!