Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विखे समर्थकांची कोपरगावात कोल्हेंविरोधात मोहीम

Share

कोल्हे समर्थक भाजप कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप

कोपरगाव (प्रतिनिधी) – विखे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कोपरगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार सौ. स्नेहलता कोल्हे यांना पाठबळ देण्याऐवजी विरोधात काम केले, असा आरोप करून कोल्हे समर्थक भाजपा कार्यकर्त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. यामुळे कोल्हे यांचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही पुणतांबा परिसरातील कार्यकर्ते धनंजय जाधव व अन्य जणांनी व्यक्त केली आहे.
जाधव यांच्यासह भाऊसाहेब चौैधरी, गंगा चौैधरी, बाळासाहेब वाघ, शिवाजीराव लहारे, भाजपाचे प्रातिक सदस्य अ‍ॅड रवींद्र बोरावके व कोपरगाव भाजपा तालुका अध्यक्ष शरद थोरात यांनी पत्रक काढले आहे. त्यात विखे कुटुंबीयांनी पक्षाच्या उमेदवार सौ. कोल्हे यांच्यामागे पाठबळ उभे केले असते तर विजय अधिक सुकर झाला असता, असा दावाही करण्यात आला आहे.

कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा परीसरातील दहा गावात विखे यांचे प्राबल्य आहे. तेथे मोठ्या प्रमाणात विखे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार कोल्हे यांच्या विरुध्द मोहीम राबविली. या परिसरातील वाकडी, जळगाव येथील विखे यांचे समर्थक कार्यकर्ते ‘आदेश’ आला असे सांगत होते, असा दावाही पत्रकात आहे.

11 आक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपरगाव येथे आमदार कोल्हे यांचे प्रचारार्थ आले होते. तेव्हा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सौ. स्नेेहलता कोल्हे या आपल्या भाची असून मामा म्हणून त्यांना निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे, असे जाहीरपणे सांगीतले होते. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी मतदार संघात गणेश साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांमार्फत सर्व पाठबळ भावाच्या म्हणजेच अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांच्यामागे उभे केले.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर खासदार सुजय विखे यांनीही जिल्ह्याात भाजपा-सेना युतीचे 12 आमदार निवडून आणनार असा दावा केला. मात्र ते भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ फिरकले नाहीत. सौ.स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या 5 वर्षांत मतदार संघात मेरीटेचे काम करून दाखविले आहे. भविष्यात आमदार कोल्हे यांची त्यांना अडचण वाटू लागली आहे, असेच जाणवत आहे. तरी विकासाभिमुख कोपरगावासाठी मतदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याच पाठीशी आहे. त्यांचा विजय हा निश्चित आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!