कोपरगाव तालुक्यात 81.74 टक्के मतदान

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी किरकोळ कुरबुरी वगळता मतदान शांततेत झाले. 81.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर कदम यांनी दिली.
तालुक्यातील भोजडे व वडगाव येथील सरपंच व सदस्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सकाळी ते दुपारपर्यंत मतदानाचा वेग अत्यंत धिम्या गतीने होता. दुपारनंतर मात्र मतदानासाठी गर्दीवाढू लागली ती संध्यकाळी उशीरापर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या सरपंचदाच्या 25 जागांसाठी 155 उमेदवार रिंगणात आहेत
तर 240 सदस्यांसाठी 810 जण रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य काल मतपेटीत बंद झाले आहे. ग्रामपंचायत निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी : सडे (56.71 टक्के), वेस सोयगांव (88.67 टक्के), तळेगांव मळे (91.99 टक्के) चांदेकसारे (83.28 टक्के), कोळपेवाडी (84.32 टक्के) चासनळी (8074 टक्के) धारणगांव (86.45 टक्के) खिर्डी गणेश (85.22 टक्के) पढेगांव (88.60 टक्के) रांजणगांव देशमुख (84.69 टक्के) डाऊच बु. (87.78 टक्के) मोर्विस (92.3 टक्के) हडेवाडी (78.27 टक्के),
बक्तरपूर (84.73) माहेगांव देशमुख (81.86 टक्के) भोजडे (बिनविरोध) वडगांव (बिनविरोध) डाऊच खु (89.10 टक्के) सोनेवाडी (85.15 टक्के) खोपडी (90.80 टक्के) शिंगणापूर (63.2 टक्के) देर्डे कोर्‍हाळे (87.40 टक्के) करंजी बु (85.10 टक्के), बहादरापूर (93.19 टक्के ) बहादराबाद (90.49) शहापूर (89.53) टक्के मतदान झाले आहे.
तहसीलदार किशोर कदम, नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, तसेच ग्रामीण पोलीस निरिक्षक साहेबराव कडणोर तसेच पोलीस निरिक्षक सुरेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 550 कर्मचार्‍यांची नेमणुक करण्यात आली होती. अनेक ठिकाणी वयोवृद्ध पुरुष महिला अपंग व्यक्ती तसेच तरुणांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर केले जाणार आहेत. कोण निवडून येणार यासंदर्भात गांवकट्ट्यावर पैजा लागल्या.

 

LEAVE A REPLY

*