Type to search

Featured सार्वमत

कोपरगाव शहरात तणाव

Share

टोळक्यांकडून दोन तरूणांना मारहाण, गाडीची मोडतोड

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- येथील गांधी नगर मस्जिद समोरील रस्त्यावरून जात असतांना दोन समाजाच्या तरूणांमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण नंतर हातघाईवर गेले. तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर एका तरूणाने आपल्या समर्थकांना बोलावून आणून स्वीप्ट चालकाची धुलाई केली. त्यामुळे दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आल्याने कोपरगावात तणाव निर्माण झाला होता. ही घटना रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

गांधीनगरमधील एका चौकातून नयन मेहेरे गाडी मालक आणि चालक सनी पंडोरे व सुमित दुसाने स्वीप्ट कारने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी तेथे एक तरूण मोटारसायकल लावून उभा होता. विनंती करूनही या तरूणाने गाडी बाजूला घेतली नाही. त्यातच स्वीप्ट कारचा या मोटारसायकलला धक्का बसला. त्यामुळे संतापलेला तरूण आणि स्वीप्टचा चालक, मालक यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यातून शिवीगाळ झाली.

हे तरूण हातघाईवर आले नी त्यांच्यातच जुंपली. दोघांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा गोंधळ काही काळ चालला होता. त्यानंतर मोटारसायकलस्वार आपल्या घरी गेला. काही वेळातच आपल्या समर्थकांना घोऊन आला. आल्या आल्या या टोळक्याने सनी पंडोरे आणि सुमित दुसाने यांना काठ्या,लाठ्यांनी जोरदार मारहाण केली. हे पाहिल्यावर चालकाच्या घरचे सोडविण्यास आले तर या टोळक्यांनी त्यांनाही मारहाण केली. तसेच स्वीप्ट कारच्या काचा फोडल्या. या प्रकाराने पंडोरे आणि सुमित दुसाने गटाचे लोक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

घटनेची माहिती कळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. पो. नि. राकेश मानगावकर रजेवर आहेत. तणाव लक्षात घेऊन श्रीरामपूर, राहाता येथून वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त नव्हते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!