Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकोपरगावात स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती

कोपरगावात स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती

कोपरगाव नगरपरिषदेचा उपक्रम; स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी : नगराध्यक्ष

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटिंग मानांकन मिळविण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2020 करिता लवकर केंद्रीय समिती मार्फत शहर स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी होणार आहे. त्यामध्ये कचरामुक्त शहर व 5 स्टार रेटिंग मानांकन प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षणात देशाच्या पटलावर कोपरगावचे नाव कोरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्रीय समितीने कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर शासनाकडून कोपरगाव नगरपरिषदेला जऊऋ++ मानांकन दर्जा मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात समावेश झाल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. यानुसार कोपरगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरीता अपेक्षित कामात लोकसहभाग वाढावा यासाठी जिओकॉन कन्सल्टन्सी, पुणे या संस्थेमार्फत शहरात घरोघरी जावून स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात येत आहे. या संस्थेकडून नागरी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार घरांत निर्माण होणारा कचरा ओला व सुका तसेच घातक कचरा असे वर्गीकरण करून स्वतंत्रपणे साठवावा व वर्गीकृत कचरा इतरत्र न टाकता कचरा संकलनासाठी येणार्‍या घंटागाडीतच द्यावा तसेच ओल्या कचर्‍यापासून खत निर्मितबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

शहरातील भिंतीवर स्वच्छताविषयक संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छताविषयक संदेशाने नगरपरिषदेच्या भिंतीही उजळू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छतेला गती देण्यासाठी प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी, वाहतूक, साठवणूक न करणे याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना व आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आलेले असून प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा यावर देखील जोर दिला जात आहे.

दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत कोपरगाव शहराला कचरामुक्त शहराचे 5 स्टार रेटिंग मानांकन मिळविण्यासाठी नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य विभाग सभापती, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, कार्यालय अधीक्षक तसेच सर्व अधिकारी, सर्व सफाई कर्मचारी, जिओकॉन कन्सल्टन्सी यांचे प्रतिनिधी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहर साफसफाईचे ठेकेदार मॅक्रो इकॉनॉमिकल इन्व्हायरोमेंट सोल्युशन प्रा. लि. नाशिक यांचे सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय साफसफाईचे ठेकेदार सेवा फाउंडेशन, पुणे हे अथक परिश्रम घेत आहेत. तरी शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या