कोपरगाव : मुख्याधिकार्‍यांच्या गलथान पणामुळे 90 कोटींची योजना 100 कोटींवर

0

नगराध्यक्ष वहाडणे यांची मुंबईत डीएमए कार्यालयाला भेट

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- 92 कोटी रुपयांची योजना केवळ कोपरगाव नगरपरिषदेच्या काही अधिकार्‍यांच्या गलथान पणामुळे 100 कोटींचे वर जाऊन पोहचली. अशी खळबळजनक माहिती मुंबई येथील नगरपरिषद संचालनालय डीएमए कार्यालयाला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भेट दिली त्याप्रसंगी समजली.

मुंबई येथील नगरपरिषद संचालनालय डीएमए कार्यालयाला वहाडणे यांनी भेट दिली. याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी श्री. हिरे यांच्याशी कोपरगाव शहरासाठी भूमिगत गटार व पाणी शुद्धीकरण योजनेबद्दल चर्चा केली. या चर्चेतून धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या वर्षभरापासून डीएमए कार्यालयाने प्रस्तावातील काही त्रुटींची पूर्तता करायला सांगितलेली असूनही कोपरगाव नगरपरिषदेमधील मुख्याधिकार्‍यांनी त्या त्रुटींची पूर्तता का करून घेतली नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना फोन केला मात्र त्यांनी तो घेतला नाही. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे स्वत: डीएमए कार्यालयाला गेले तेव्हा या बाबी उघडकीस आल्या.

डीएमए कार्यालयातच प्रस्ताव पडून आहे. असे आजवर सांगणार्‍या अधिकार्‍यांची बनवाबनवी समोर आली. संगमनेरच्या श्री. साबळे यांच्याशीही डीएमएने चर्चा केली असता कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांकडून सहकार्य मिळत नाही असे उत्तर त्यांना मिळाले. यावेळी संजय कांबळे, विनायक गायकवाड, राजेंद्र खैरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*