समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास गती; धोत्रे गावातील शेतकऱ्याला मिळाला चार पट मोबदला

0

कोपरगाव : आज दिनांक 29 जुलै 2017 रोजी समृद्धी महामार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाच्या श्री. दादासाहेब सारजामन आधोडे या शेतकऱ्याचा गट नंबर 116/2 पैकी 2 एकर बागायत क्षेत्राची शासनाच्या थेट खरेदी पध्दतीने खरेदीखताची नोंदणी करण्यात आली.

या योजने मुळे भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चार पट व शासनाच्या सहमती मोबदला थेट खरेदी पध्दतीने शेतकऱ्यास 5 % वाढीव रकमेचा लाभ सदर शेतकऱ्याने घेतला.

सदर खरेदीखत नोंदणी करण्यापूर्वी 2 तास आधीच शेतकर्याच्या बँक खात्यात आरटीजीएस द्वारे रूपये 78,24,852/- जमा करण्यात आले.

यावेळी एमएसआरडीसीचे भूसंपादन उपजिल्हाअधिकारी श्री. विठ्ठल सोनवणे, शिर्डी उपविभागीय अधिकारी श्री. रविंद्र ठाकरे, इगतपुरी चे उपविभागीय अधिकारी श्री. पाटील, कोपरगावचे तहसीलदार श्री. किशोर कदम, सह दुय्यम निबंधक व धोत्रे गावचे प्रगतशील शेतकरी श्री. उमेश शिंदे, तसेच धोत्रे गावाचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री. संजय चव्हाण, प्रदीप चव्हाण, किसन माळवदे, दत्तात्रय माळवदे, इलियास शेख, राजेंद्र काळे इत्यादी हजर होते.

आता समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास खर्या अर्थाने गती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*