कोपरगावात थेट जमिन खरेदीच्या अधिसूचनेची होळी

0

किसान सभा व शेतकरी संघर्ष कृती समितीचा समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध

सोनेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील दहा गावांतील शेतकर्‍यांची हजारो एकर बागायती जमिन सरकार नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी सरकार संपादित करणार आहे. शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने काढलेल्या थेट जमिन खरेदी अधिसूचनेची आखिल भारतीय किसान सभा व शेतकरी संघर्ष कृती समितीने काल सोमवारी सकाळी 11 वाजता होळी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शिर्डी विभागाचे अध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे, संघटक कॉ. बाबा शेख, कार्याध्यक्ष कॉ. प्रा. एल.एम. डांगे, कृती समितीचे शंकरराव चव्हाण, मतीन शेख, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर होन, साहेबराव होन, रावसाहेब धट, दादासाहेब काजळे, प्रशांत शिंदे, किसन आंबीलवादे, भाऊसाहेब होन, नानासाहेब गायकवाड, गणेश डुबे, माधवराव गायकवाड, सोपान शिंदे, गणेश होन, कृष्णा शिलेदार, प्रकाश ईनामके आदी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर सरकारच्या या प्रकल्पाला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला.
सरकारच्या विरोधात केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. किसान सभा व बाधीत शेतकरी यांच्यावतीने निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसारे यांना निवेदन देण्यात आले. सरकार जर बळजबरीने आमच्या जमिनी हडप करत असतील तर आम्ही कुटुंबासमवेत कोणत्याही मार्गाचा अवलंब करू. समृद्धी महामार्ग रद्द करा, विकास करायचा असेल तर शेजारी असलेला जुना नागपूर मुंबई हायवे विकसित करा अशाही सुचना निवेदनात केल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*