कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात; न्यायालयाबाहेर बंदोबस्त

0

अहमदनगर (प्रतिनिधी) ता. ८ : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा अंतिम निकाल आज थोड्याच वेळात समजणार असून सुनावणीसाठी न्यायालयाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व कटाचा आरोप असणाऱ्या भैलुमे व संतोष भवाळ यांच्या शिक्षेवर थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान सर्व आरोपींना न्यायालयात आणले असून येथे गर्दी जमली आहे.

न्यायालयाच्या आवारात साऊंड सिस्टिम
कोपर्डीच्या आरोपींवर तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोपर्डी घटनेची धग अजूनही नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यायालयात गर्दी होऊ नये, तसेच उपस्थितांना न्यायालयाचा निकाल स्पष्टपणे ऐकता यावा, यासाठी न्यायालयाच्या आवारात साऊंड सिस्टिम लावण्यात आली आहे.

 

‘कोपर्डीचा’आज फैसला

कोपर्डी प्रकरण : मुख्य आरोपीतर्फे न्यायालयात 189 पानांचा अहवाल दाखल

LEAVE A REPLY

*