कोपर्डीची आजपासून अंतीम सुनावणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शालेय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (दि.10) होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी आज बुधवार (दि.11) रोजी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर होणार आहे.    राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील सर्व साक्षीदार तपासून झाले आहेत. आता अंतीम निकालासाठी अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*