कोपर्डी : स्पेशल स्टोरी

0
अ‍ॅड. निकमांचे अभिनंदन करताना कोपर्डीकर

सागर शिंदे 

कडेकोट पोलीस बंदोबस्त, नितीन भैलुमे ढसाढसा रडला, फाशीच्या मागणीसाठी 58 मोर्चे, अवघ्या 10 मिनीटात तिघे दोषी, सुनावणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी, परिस्थितीजन्य पुरावे निर्णायक

 • भयमुक्त निर्भया

अहमदनगर – राज्याला हादरा देणारे कोपर्डीचे निर्भया प्रकरण आज अंतिम वळणावर येऊन पोहचले आहे. या क्रूर घटनेने समाजमन ढवळून काढले होते. सबंध राज्यातील संवेदनशील जनता या घटनेविरोधात पेटून उठली होती. राज्यातील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने जनता न्यायाची मागणी करीत रस्त्यावर उतरली होती. हे मोर्चे राज्य आणि देशासाठी लक्षवेधी ठरले होते. शनिवारी न्यायालयाने 31 पुरावे ग्राह्य धरून घटनेतील आरोपींना दोषी ठरवले. खून, अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार, छेडछाड, कट रचणे, गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे असे आरोप सिद्ध झाले. राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाला धक्का देणार्‍या या घटनेत आरोपींना आता काय शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 21 आणि 22 रोजी होणार्‍या सुनावणीनंतर न्यायालय दोषींना शिक्षा ठोठावणार आहे.

 • खटल्याची 42 वेळा सुनावणी
  20 नोव्हेंबर 2016 पहिली साक्ष नोंदवली
  22 नोव्हेंबर मूळ फिर्यादीची साक्ष
  2 ते 5 जानेवारी 2017
  13 ते 15 जानेवारी, 17 जानेवारी, 20 मार्च, 17 मार्च, 1 एप्रिल 17 एप्रिल, 5 मे, 22 मे, 23 मे, 24 मे, 22 ते 26 जून, 7 जुलै, 10 जुलै, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीचा अर्ज फेटाळला, 17 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, रवींद्र चव्हाणची साक्ष, 16 सप्टेंबर, 11 आक्टोबर, 22 आक्टोबर 2017, 26 आक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर अंतिम अहवाल, 18 नोव्हेंबरला शिक्षेवर सुनावणी सुरू.

 अ‍ॅड. निकम यांचे निर्णायक 24 मुद्दे

घटनेपूर्वी आरोपीचे मुलीशी गैरवर्तन
पीडितेचा अनैसर्गिक मृत्यू
पीडित कोपर्डी शिवारात सापडली
आरोपी घटनास्थळी हजर असणे
साक्षीदारांनी आरोपी शिंदेला पळताना पाहणे
घटनास्थळी आरोपीची चप्पल व माळ मिळाली
शिंदेने 11 जुलैला दुचाकी विकत घेतली
घटनेनंतर ती दुचाकी जळालेल्या अवस्थेत मिळाली
शिंदेचे रक्ताने भरलेले कपडे जप्त केले
पीडितेच्या अंगावरील दातांचे व्रण शिंदेचेच
21 जुलैला शिंदेकडून अश्‍लील सीडी जप्त
मोबाईल जप्त, त्यात विवस्त्र फोटो आढळले
पीडितेच्या छेडछाडीत अन्य आरोपींकडून शिंदेला मदत
तिघांनी मुलीवर अत्याचार करण्याचा कट आखला
भैलुमे, भवाळने शिंदेच्या गैरकृत्यासाठी पहारा दिला
मुलीच्या मनात दहशत निर्माण केली
घटनेच्या वेळी शिंदेचा भैलुमेस 30 सेकंदांचा फोन
गैरकृत्यानंतर पळ काढण्यास वाहन सज्ज ठेवले
तिघांनी मिळून अत्याचाराचा कट रचला
आरोपींनी विसंगत जबाब कसे दिले
रहिवास गुन्हा नाही, मात्र, सहभाग हा गुन्हा आहे.

 • महत्त्वाचे साक्षीदार
  पीआय शिवाजी गवारे (तपासी अधिकारी), नवनाथ पाखरे, मिलिंद कोडवडक (नोडल ऑफिसर), दत्तात्रय आंग्रे (नोडल ऑफिसर), शशिराज पाटोळे (तपासी अधिकारी), भाऊसाहेब कुरुंद (पोलीस कर्मचारी), डॉ. बाबासाहेब सोनवणे (वैद्याकीय अधिकरी, कुळधरण), डॉ. दयानंद पवार (वैद्याकीय अधिकरी, कर्जत), डॉ. हेमलता देशपांडे (दंत वैद्यकीय तज्ज्ञ), राजेश जगताप (फोटोग्राफर), संदीप सुद्रिक, दत्तात्रय सुद्रिक, श्रीकांत दातीर (लिपिक पंच), महादेव ढगे (तलाठी पंच), सागर जंगम, किरण सावंत (तहसीलदार), संजय लोखंडे (ठाणे अंमलदार), श्रीराम बोरुडे (भूमिअभिलेख), उमेश जपे (फोटोग्राफर), बिभीषण लिहिणे, शिवराम सुद्रिक, बाबासाहेब कायगुडे (वर्गशिक्षक), भाऊ सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक, नामदेव तोरडमल (दुचाकी दुकानदार), तात्या सूर्यवंशी (घरझडती पंच).
 • तपासाचे साक्षीदार
  पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण वाघमारे, विष्णू घोडेस्वार, सूरज वाबळे यांनी तपासात अंतिम क्षणापर्यंत काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार, मनोज गोसावी यांनी मुख्य तपासात मदत केली होती.

कोपर्डीचा घटनाक्रम

संबंधित मुलगी 11 जुलै 2016 ला सायंकाळी शाळेतून घरी येत असतांना चारी रोडवर तिघा आरोपींनी तिची छेडछाड काढली.
हा प्रकार शेळी चारणारी महिला, मुलीची मैत्रीण व अन्य दोघे असे चौघांनी पाहिला होता.
11 जुलैनंतर भीतीपोटी मुलगी शाळेत गेलीच नाही.
12 जुलैला आजारी असल्याचे सांगून मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला.
13 जुलैला तिच्या बहिणीने तिच्याशी बोलून मनातील भीती काढण्याचा प्रयत्न.
त्याचदिवशी ती मुलगी सायंकाळी 7 वाजता आजीकडे मसाला आणण्यासाठी गेली होती.
मसाला घेऊन परत येत असताना सायंकाळी 6.45 ते 7.30 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
घटनेनंतर प्रथमदर्शनी पाच साक्षीदार घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळावरील तिघांनी 7.30 वाजता आरोपीस पळताना पाहिलेे.
माहिती मिळताच 7.45 वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्याचदिवशी रात्री 8 वाजता पीडितेस कुळधरण रुग्णालयात नेण्यात आले.
रात्री 8:10 वाजता डॉ. सोनवणे यांनी पीडितेची आरोग्य तपासणी केली. मात्र, त्या आधीच ती मरण पावली होती.
रात्री 11 वाजता पुढील कार्यवाहीसाठी पीडितेचा मृतदेह कोपर्डी रुग्णालयात आणण्यात आला.
डॉ. पवार यांनी कलम 174 प्रमाणे पंचनामा केला. 14 जुलैला पहाटे 1:30 ते 2.30 वाजता लेखी पंचनामा पूर्ण झाला.
शवविच्छेदनासाठी डॉ. पवार व डॉ. कावरे यांना 14 जुलैला सकाळी 8.15 वाजता पत्र देण्यात आले.
सकाळी 9.15 ते 10.15 शवविच्छेदन पूर्ण झाले.
14 जुलैला सकाळी 10.30 वाजता पीडित मुलीचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्याच दिवशी पीडितेवर कोपर्डीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
14 जुलै रोजी पहाटे 1.10 वाजता कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
त्यानंतर त्याच दिवशी घटनास्थळाहून आरोपींची सायकल, दुचाकी, चप्पल, माळ हस्तगत करण्यात आली.
सकाळी 8 वाजता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
याच दिवशी नाशिकचे न्याय सहायक वैद्यकीय तज्ज्ञ पथकाने 13 वस्तू जप्त केल्या.
14 जुलै रोजी पुरवणी जबाब व मैत्रिणीसह महत्त्वाच्या चौघांचे जबाब नोंदविण्यात आले.
15 रोजी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यास रात्री 12.10 वाजता श्रीगोंदा बस स्थानकावरून अटक करण्यात आली.
शिंदेला न्यायालयाने दोन टप्प्यांत एकूण 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
16 जुलैला संतोेष भवाळला कुळधरण येथून रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली.
भवाळला पुढील तपासासाठी दोन टप्प्यांत एकूण 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
16 जुलैला हा तपास पीआय गवारे यांच्याकडून एलसीबीचे शशिराज पाटोळे यांच्याकडे वर्ग करण्यासाठी एसपींनी पत्र दिले.
17 जुलैला आरोपी नितीन भैलुमे यास पुण्यातून अटक करण्यात आली.
भैलुमे याला दोन टप्प्यांत 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली
20 जुलैला घटनास्थळाचा नकाशा काढण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयास पत्र देण्यात आले.
23 जुलैला पीआय पाटोळे यांनी डॉक्टरांना पत्र लिहिले. पीडितेवर काय उपचार केले याबाबत माहिती मागविली.
25 जुलैला डॉक्टरांचे पत्रास उत्तर आले. पीडितेच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या 16 जखमा होत्या.
28 जुलैला शिंदे, भवाळ व भैलुमे या तिघांच्या नार्कोसाठी त्यांची मुंबईला रवानगी करण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी एकूूण 70 साक्षीदारांचे जबाब दोषारोपपत्रात नोंदविले.
11 आक्टोबरला 2016 रोजी म्हणजे 87 दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
15 आक्टोबरला सर्व वकिलांची बैठक झाली. आरोपीचे वकीलपात्र न घेण्याचा निर्णय.
18 आक्टोबरला अ‍ॅड. योहान मकासरे यांची जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ या दोघांचे वकील म्हणून शासनाने नियुक्ती केली.
20 नोव्हेंबरला पहिला साक्षीदार श्रीरंग बोरुडे यास तपासले.
4 सप्टेंबर 2017 रोजी रवींद्र चव्हाण यांची शेवटची साक्ष तपासण्यात आली.

 • कोपर्डी खटल्याच्या निकालास उशीर का?
  संवेदनशील खटल्याची सुनावणी तात्काळ होण्यासाठी शासन प्रयत्नशील असते. मात्र, छोट्याछोट्या मुद्द्यावर आरोपीचे वकील उच्च न्यायालय व सर्वेच्च न्यायालयात गेले. त्यामुळे कोपर्डी खटल्याची सुनावणी लांबणीवर पडली. तर बचाव पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ज्येष्ठ पत्रकार, जिल्हाधिकारी व अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना देखील आरोपीच्या वतीने साक्षीदार करण्याची मागणी करण्यात आली. हा अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने केवळ रवींद्र चव्हाण या एकच व्यक्तीची साक्ष घेण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वकीलांना वेळोवेळी पोलीस संरक्षण मिळाले नाही. त्यामुळे ते गैरहजर राहिले. यासह अन्य कारणांमुळे सुनावणी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना तंबी दिल्यामुळे खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली. मात्र, यात आरोपीला मोठा दंड भरावा लागला. त्यामुळे 367 (एक वर्षे 2 दिवस) दिवसांनी कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला.
 • दैनिक सार्वमत पहिल्या बातमीचा साक्षीदार
  13 जुलै 2016 रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोपर्डीची घटना घडली. तिचे सविस्तर वृत्त दैनिक सार्वमतने प्रसिध्द केले. कोपर्डी घटनेचा घटनाक्रम, संशयित आरोपी, घडलेली घटना, राक्षसी कृत्य, आरोपीचे वाहन, पोलिसांची चौकशी, नातेवाईकांचा आरोपीमागे झालेला पाटलाग, पोलिसांची चौकशी याचे विस्तृत माहिती दै. सार्वमतने मांडली वास्तव घटना काय आहे, याची माहिती वाचकांपर्यंत पोहचविली. वकिलांनी देखील याची दाखल घेतली होती. त्यामुळे राज्यभर चर्चेत ठरलेल्या कोपर्डी घटनेचा दै. सार्वमत साक्षीदार ठरला.
 • त्यांचेदेखील लचके तोडा…
  माझ्या मुलीच्या शरीराचे जसे लचके तोडले तसे आरोपींचेदेखील लचके तोडा. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. या न्यायामुळे राज्यातील सर्व मराठा मुलींना प्रेरणा मिळणार आहे. ज्या मराठा मुलींनी माझ्या मुलीसाठी आंदोलन उभे केले, त्यांचे मी आभार मानते. माझी छकुली नसली तरी सगळ्या मराठा मुली माझ्याच मुली आहेत. माझ्या समाजाने मला सर्वात जास्त मदत केली. माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे ऋण व्यक्त करते.- (निर्भयाचे आई-वडील)
  (असे म्हणत असताना त्यांचा अश्रूंचा बांध फुटला.)
 • तिघांनाही फाशीच व्हावी
  मराठा समाजाच्या मनात जी धग होती, ती या निकालाच्या रूपाने प्रत्यक्षात उतरली आहे. आज दोष निश्‍चित झाले असून 22 तारखेनंतर न्याय मिळणार आहे. आरोपींना फाशी व्हावी, यासाठी आम्ही अ‍ॅड. निकम यांना भेटणार आहोत. तिघांनाही फाशी व्हावी ही सगळ्या मराठा समाजाची इच्छा आहे. कोपर्डीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.
  – संजीव भोर (अध्यक्ष, शिवप्रहार संघटना)
 • आरोपींना धडा
  न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकांना अपेक्षित निकाल आहे. आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या कलमानुसार त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे. असे गैरकृत्य करणार्‍यांना हा मोठा धडा आहे. न्यायालयाचा निर्णय कोपर्डीच्या गावकर्‍यांना मान्य राहील.
  – रोहिणी सुद्रिक (सरपंच, कोपर्डी)
 • फाशी होईल त्या दिवशी खरा न्याय…
  घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे निर्भयाच्या मागे संपूर्ण मराठा समाज उभा राहिला. निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा मुली, कार्यकर्ते, गावकरी, सरकार, अ‍ॅड. निकम यांचे योगदान मोलाचे आहे. ज्या दिवशी तिघांना फाशी होईल तो दिवस खर्‍या अर्थाने न्यायाचा दिवस असेल. या प्रकरणात पोलीस यंत्रणा, डॉक्टर यांनी देखील मोठे कष्ट घेतले. त्यामुळे आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.
  समीर पाटील व शिवराम सुद्रिक (ग्रामस्थ, कोपर्डी)
 • रोडरोमियो व छेडछाड करणार्‍यांना धडा
  ग्रामीण भागात अनेक विद्यार्थिनी शाळेमध्ये जातात. निर्भयाच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण होते. कोपर्डीच्या या निकालामुळे गुंडागिरी, रोडरोमियो व छेडछाड करणार्‍यांना धडा मिळाला आहे. या निकालामुळे मुलींना सुरक्षित वाटणार आहे. येणार्‍या 22 तारखेस जो निकाल येईल, त्याचा आम्ही सन्मान करू.
  सूर्यभान सुद्रिक (निर्भयाच्या शाळेचे प्राचार्य)

 

LEAVE A REPLY

*