कोपर्डीचा निकाल 18 नोव्हेंबरला?

0
सरकार पक्ष व आरोपींच्यावतीने युक्तीवाद पूर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील बहुचर्चीत कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची तब्बल 16 महिने 5 दिवसांनंतर ही प्रतिक्षा संपणार असून 18 नोव्हेंबर रोजी तिघांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. सरकार पक्ष व आरोपींच्यावतीने लेखी व तोंडी युक्तीवाद पूर्ण झाला असून अ‍ॅड. मकासरे आज (शुक्रवार दि. 10) मुख्य आरोपीचे लेखी म्हणणे सादर करणार आहेत. त्यामुळे या खटल्यात नेमके काय होईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले आठ दिवसानंतर यावर अंतिम निकाल देणार आहेत.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी खटल्यात 70 पैकी 31 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी 24 मुद्यांच्या आधारे युक्तीवाद मांडला. तर तिनही आरोपींच्या वकीलांनी या मुद्यांना खोडण्यासाठी आरोप प्रत्यारोप केले. अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी संतोष भवाळ याची बाजू मांडताना 70 पानांचा लेखी अहवाल सादर केला असून त्यात 123 मुद्दे मांडण्यात आले आहेत.

तसेच नितीन भुैलुमे याचे वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी 20 पानांचा अहवाल सादर केला असून 16 मुद्दे मांडण्यात आले आहेत. यात सर्वेच्च न्यायालयातील मंजुश्री सारडा विरुद्ध शरद सारडा, करदारसिंग विरुद्ध हरियाणा सरकार व सियाराम विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांचे तीन दाखले देखील जोडले आहेत. त्यातून अ‍ॅड. आहेर यांनी मांडले आहे की, आरोपी भैलुमे याच्यावर गुन्ह्यास प्रवृत्त करणे व कट कारस्थान रचणे हे सिद्ध होत नाही, असा युक्तीवाद केला आहे. तसेच अंतिम म्हणणे मांडताने ते म्हणाले, पिडीत मुलीची छेडछाड काढली होती. हा प्रकार तिने आईला सांगितला होता.

मात्र, पोलिसांनी आईची साक्ष का घेतली नाही. भैलुमेला अटक केली त्या पोलिसांची साक्ष का नाही. आरोपी रस्त्यावर फिरत होता, तेव्हा त्याला बाबासाहेब म्हणाला, तुम्ही इकडे का फिरत आहे, त्या बाबासाहेबाची साक्षी नाही. पिडीत मसाला आणण्यासाठी आजीकडे गेली होती. त्या आजीची साक्ष नाही. त्यामुळे भैलुमेच्या विरूद्ध एकही सबळ पुरावा नाही. त्यामुळे सबळ पुराव्याआभावी त्याची निदोेेष मुक्तता करण्यात यावी. पुरावे नसतील तर अशा खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सोडल्याचे दाखले त्यांनी न्यायालयात सादर केले आहे. गुरूवारी (दि.9) रोजी त्यांचा लेखी व तोंडी युक्तीवाद पुर्ण झाला आहे. घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने अ‍ॅड. मकासरे लेखी अहवाल आज सादर करणार आहे.
…………
तपासात सापडले तिसरेच तपासी अधिकारी – 
पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी तपास केल्यानंतर तो 20 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे शशिराज पाटोळे यांच्याकडे वर्ग केला होता. तरी देखील गवारे तपासात होते. आता मात्र आणखी एका तपासी अधिकार्‍याचा शोध लागला आहे. विजय लगारे या अधिकार्‍यांची कोठेही नोंद नसताना 27 जुलै रोजी महत्वाचे जबाब नोंदविल्याची नोंद आहे. त्यांनीच आरोपींना नार्को करण्यासाठी मुंबईला नेल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याचा अहवाल गायब झाल्याचे लक्षात येते. यावर अ‍ॅड. मकासरे 150 पेक्षा जास्त पाने व 200 पेक्षा जास्त मुद्दे न्यायालयात दाखल करणार आहेत.

LEAVE A REPLY

*