कोपर्डी खटल्याची सुनावणी 17 ऑगस्टला

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपर्डी प्रकरणात मुख्यमंत्री, ऍड. निकम व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भाषणे व मुलाखती जमा करणार्‍या राहुल चव्हाण यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आज शुक्रवारी (दि.4) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या 17 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती ऍड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

 

 

ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांना आरोपीचा साक्षीदार म्हणून तपासण्याची मागणी ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यामुळे 29 जुलै रोजी उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते.

 

 

या प्रकरणावर गुरूवारी (दि.3) युक्तीवाद झाला मात्र तेथे देखील खोपडे यांना लाल कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे त्यांनी सर्वेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ऍड. उज्ज्वल निकम व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ज्या ठिकाणी मुलाखती व भाषणे दिली होती.

 

 

त्यांचे संकलन करणार्‍या रविंद्र चव्हाणला या खटल्यात साक्षीदार म्हणून तपासण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून त्यास शुक्रवारी (दि.4) नोटीस देण्यात आली आहे. त्याची साक्ष 17 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती ऍड. निकम यांनी दिली आहे. हा नवा साक्षीदार न्यायालयात काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्वेच्च न्यायालयाने जर सहा जणांना साक्षीदार म्हणून तपासण्यास परवानगी दिली तर सरकार कक्षाच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*