कोपर्डी अत्याचार प्रकरण : प्रमुख आरोपी जितेंद्र शिंदे म्हणतो, तो मी नव्हेच!

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोपर्डी येथे एका शालेय मुलीवर अत्याचार करुन तिला ठार करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. हा खटला अंतिम टप्प्यात असून घटनेतील तीन आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. पीडित मुलीवर अत्याचार करुन तिला ठार मारणार्‍या आरोपीचे बुधवारी (दि.21) जबाब नोंदविण्यात आले आहेत.
जितेंद्र शिंदे याने जबाबात सांगितले की, या घटनेशी माझा काही संबंध नाही. पोलिसांनी जातीय वादातून मला अटक केली आहे. घटनेत सादर केलेले पुरावे मला मान्य नाही. साक्षीदारांनी सांगितलेल्या घटना बहुतांशी खोट्या आहेत. गुन्ह्यातील दुचाकी माझी नाही, पोलिसांंनी माझ्या घरातून मोबाईल व अश्‍लिल सीडी जप्त केल्या याबाबत मला कल्पना नाही.

माझ्या गळ्यातील माळ दाखविण्यात आली आहे. ते देखील खोटे आहे. या घटनेला जातीय रंग देऊन ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरोपी जितेंद्र शिंदे यांने जबाबात म्हटले आहे. दरम्यान, या खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे असून त्याचे विरोधात अनेक साक्षीदारांनी साक्ष दिली आहे.

जर न्यायालयाने परवानगी दिली तर..
अ‍ॅड. निकम हे पीडित मुलीची बाजू न्यायालयात मांडत आहे. हा खटला अंतीम टप्प्यात आल्यानंतर आरोपीने अ‍ॅड. निकम यांनी आरोपीचा साक्षीदार म्हणून तपासण्याची विनंती केली आहे. आता श्री.निकम यांनी न्यायालयात म्हणणे मांडल्यानंतर न्यायालयाने जर हे साक्षीदार तपासण्यात परवाणगी दिली. तर जिल्हाधिकार्‍यांसह निकम यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात उभे रहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*