कोपर्डी स्मारक प्रकरण : अखेर निर्भयाचा पुतळा हटविला

0
कर्जत (प्रतिनिधी) – कोपर्डी येथील निर्भयाच्या कुटुंबीयांनी स्मारकावर बसवलेला पुतळ्यावरून विविध संघटनांनी व्यक्त केली. त्यानंतर शनिवारी दुपारी अखेर नातेवाईकांनी पुतळा काढून घरामध्ये ठेवला आहे. यामुळे स्मारक की समाधी या वादावर आता पडदा पडला आहे.
कोपर्डी येथे राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी निर्भयाचे स्मारक उभा केले होते. मात्र यावर निर्भयाचा पुतळा बसविण्यापूर्वीच संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा निर्भयाचे स्मारक उभारण्यास तीव्र विरोध केला होता. मात्र असे असतानाही 13 तारखेस रात्री सात वाजता त्या उभारलेल्या स्मारकावर निर्भयाचा पुतळा कुटुंबीयांनी बसवला होता.
मात्र हे समजताच काल दुसर्‍या दिवशी वातावरण पुन्हा तणाव निर्माण झाल्याने निर्भयाच्या नातेवाईकांनी तो पुतळा पांढर्‍या कापडाने झाकून टाकला होता. मात्र पुतळा उभा केल्याचे वृत्त समजातच संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळेंसह विविध संघटनाचे पदाधिकारी संतप्त झाले होते. तर पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मात्र यामुळे वाद होणार असेच वाटत होते.

 

LEAVE A REPLY

*